Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीरामपूर रेल्वे स्टेशनचा अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेत समावेश

श्रीरामपूर/प्रतिनिधी : येथील रेल्वे स्टेशनचा अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेत समावेश झाल्याने रेल्वे प्रशासनाने प्रवासी संघनेची बैठकीत अभिनंदन करणा

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी
साकरवाडीमध्ये मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन
आमदार डॉ. लाहमटे यांच्या जनता दरबारातून अनेकांचे प्रश्‍न मार्गी

श्रीरामपूर/प्रतिनिधी : येथील रेल्वे स्टेशनचा अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेत समावेश झाल्याने रेल्वे प्रशासनाने प्रवासी संघनेची बैठकीत अभिनंदन करणार ठराव संमत करण्यात आला. संघटनेची कार्यकारी मंडळ व नियामक मंडळ यांची संयुक्त बैठक प्रवासी भवन मध्ये संपन्न झाली. या बैठकीचे अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष रणजीत श्रीगोड हे होते. सेक्रेटरी अनिल कुलकर्णी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.
सर्वश्री डॉ. गोरख बारहाते, विठ्ठलराव कर्डीले, विजय सेवक, दत्तात्रय काशिद, रविंद्र शहाणे, किरण घोलप यांनी विविध प्रश्‍नांवर चर्चा करुन मध्य रेल्वे बेलापूर रेल्वे स्टेशनचा पुन्हा समावेश केल्याने आनंद व्यक्त करुन सोलापूर विभागाचे व प्रशासनाचा अभिनंदन करणारा ठराव संमत करण्यात आला. आमदार लहू कानडे व प्रवासी संघटनेने या प्रकाराची गंभीर दखल घेवून तातडीने निवेदने देवून व संबंधित अधिकार्‍यांकडे संपर्क साधून भविष्यात बेलापूर रेल्वे स्टेशनचे महत्व कसे वाढेल याबाबत लक्ष वेधण्यात आले. रेल्वेने येथील अमृतभारत रेल्वे स्टेशन योजनेतील सुविधां संदर्भात सुचना मागितल्या होत्या, त्यानुसार सहाय्यक मंडळ अभियंता कार्यालयात सर्वश्री विजय सेवक, रणजीत श्रीगोड, गोरख बारहाते, दत्तात्रय काशिद यांनी अहमदनगर येथील अधीक्षक पी.के मिश्रा यांना विविध प्रवासी सुविधा व आकर्षक, सुंदर रेल्वे स्टेशनची वास्तु व रचना या बाबत निवेदन सादर करून चर्चा केली. रल्वे स्टेशनच्या आधुनिक पध्दतीने होणारी रेल्वे स्टेशनची नवीन वास्तू शहराचे वैभवात भर घालणारी ठरणार आहे. या कामास सुरुवात लवकरच सुरु होणार आहे. अकोळनगर, अहमदनगर या रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचे काम पुर्ण झाल्यानंतर स्टेशन परिसरातील दुहेरी रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करून प्लॅटफॉर्म नं. एक 24 बोगीचा विस्तार होणार आहे. त्यानंतर इतर कार्यालयीन इमारतीचे काम पुर्ण होईल. रेल्वे विभागाचे व्यवस्थापक निरज दोहारे, वरिष्ठ मंडल वाणिज्य व्यवस्थापक एल. के. रेणवळे यांचे अभिनंदन करण्यात आले. रेल्वे स्टेशनचे अधुनिकीकरण पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध होणार आहेत. देशात अनेक रेल्वे स्टेशनवर खासदारांच्या शिफारशींनुसार थांबा देण्यात येत असल्याने श्रीरामपूरच्या रेल्वे स्टेशनवर सर्व एक्सप्रेस रेल्वेगाड्यांना थांबा मिळणेबाबत खा. सदाशिवराव लोखंडे यांना निवेदन देण्यात येणार आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्यास प्रवाशांची गैरसोय दूर होवून स्टेशनचे महत्व वाढेल असे योगगुरु अनिल कुलकर्णी यांनी सांगितले.

COMMENTS