Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरक्षणाचा निर्णय लवकर घ्या, अन्यथा गाठ आमच्याशी ः प्रतीक्षा बंडगर

चौंडीतील आमरण उपोषण 20 व्या दिवशीही सुरूच

जामखेड/प्रतिनिधी ः गेल्या 19 दिवसांपासून चौंडी येथे उपोषणाला बसलेले माझे वडील सुरेश बंडगर व आण्णासाहेब रूपनवर यांच्या पोटात अन्नाचा कण नाही, तरीह

Ahmednagar : पोलिस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 17 गंभीर गुन्हे दाखल | LOKNews24
देवळाली प्रवरात तलवारी फिरवत तरूणांची दहशत
खासगी गाडीत चक्क EVM मशीन सापडली! पहा ‘सकाळच्या ताज्या बातम्या’ | LokNews24

जामखेड/प्रतिनिधी ः गेल्या 19 दिवसांपासून चौंडी येथे उपोषणाला बसलेले माझे वडील सुरेश बंडगर व आण्णासाहेब रूपनवर यांच्या पोटात अन्नाचा कण नाही, तरीही सरकारला यांचे म्हणणे ऐकून घ्यायला वेळ नाही. धनगर समाजाचा एवढा अपमान करू नका लवकर निर्णय घ्यावा अन्यथा गाठ धनगर समाजाशी आहे अशा इशारा उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांची कन्या प्रतीक्षा बंडगर यांनी सरकारला दिला.
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या किर्ती स्तंभाशेजारी यशवंत सेनेच्यावतीने धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, यासाठी गेल्या 19 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले मुंबई येथे सरकारने आरक्षण संदर्भात बोलविलेल्या बैठकीला गेले होते. पण त्यावेळी झालेली चर्चा ही निष्फळ ठरली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील धनगर बांधव अधिक आक्रमक झाला आहे. रविवारी 24 सप्टेबर रोजी चौंडी येथे उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांचे कूंटुब आले होते. यावेळी कुटुंबाला आपल्या भावना अनावर झाल्या होत्या. आतापर्यंत राज्यातील 36  जिल्ह्यांतुन लाखोंच्या संख्येने धनगर समाज बांधवांनी चौंडी येथे येऊन धनगर आरक्षणासाठी बसलेल्या उपोषणकर्त्याना उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला. मोटारसायकल रँली, पायी रँलीद्वारे घोषणा देत चौडी परिसर दणाणून सोडला. यावेळी शेकडो तरूणांनी सरकारच्या धोरणाविषयी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. गेल्या 70 वर्षापासून तेवत ठेवलेला धनगर समाजाच्या आरक्षणाचा वटहुकुम जारी करण्यात यावा अशी मागणी उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आलेल्या महाराष्ट्रातील धनगर बांधवांनी केली आहे.दि 24 रोजी धनगर आरक्षण कृती समिती भुमचे बिभीषण वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवन खांडेकर, बाळासाहेब कांबळे, महादेव मारकड, सुनिल बुटे, रघूनाथ वाघमोडे, आण्णासाहेब पाटील, आण्णासाहेब महारनवर, शरद चोरमले, बजरंग गोयकर, नवनाथ महारनवर यांच्यासह शेकडो समाज बांधव मोटारसायकल रँलीद्वारे चौंडीत पाठिंबा देण्यासाठी आले होते.

COMMENTS