Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सावळीविहीर मध्ये जावयाने केले तिहेरी हत्याकांड

कौटुंबिक वादातून पत्नी, मेव्हणा आजी सासूची हत्या

शिर्डी/प्रतिनिधी ः शिर्डीपासून पाच किलोमिटर अंतरावर असलेल्या सावळीविहीर गावात काल रात्री जावई आरोपी सुरेश विलास निकम व त्याचा चुलत भाऊ रोशन कैलास

हरेगावातील त्या जमिनी मुळ शेतकर्‍यांना मिळणार परत
कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन निर्मिती करायचीय, पण….काष्टीच्या उद्योजकाला कच्चा मालच मिळेना
अहमदनगर मध्ये मोहरम विसर्जन मिरवणूक होणार नाही| LokNews24

शिर्डी/प्रतिनिधी ः शिर्डीपासून पाच किलोमिटर अंतरावर असलेल्या सावळीविहीर गावात काल रात्री जावई आरोपी सुरेश विलास निकम व त्याचा चुलत भाऊ रोशन कैलास निकम या दोघांनी मिळून आपल्या सासुरवाडीत येऊन पत्नीच्या घरच्यांवर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात सुरेश निकमची पत्नी वर्षा गायकवाड, मेव्हणा रोहित चांगदेव गायकवाड व आजी सासू हिराबाई धृपद गायकवाड यांचा मृत्यू झाला. तर, सासू संगीता चांगदेव गायकवाड, सासरे चांगदेव गायकवाड व मेव्हणी योगिता महेंद्र जाधव हे तिघेजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर शिर्डीतील साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे.
या घटनेची माहिती मिळताच रात्री तातडीने पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, पोलिस उप अधीक्षक संदीप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, शिर्डी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सोपान शिरसाठ यांनी घटना स्थळावर जाऊन सर्व माहिती घेऊन तातडीने आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना केले. माहिती तंद्रज्ञानाचा उपयोग करत आरोपी सुरेश निकम व त्याचा भाऊ हे दोघे पळून जाण्याच्या उद्देशाने नाशिक रोडकडे मोटारसायकल वरून जात असताना नगरचे स्थानिक गुन्हे शाखेचे तुषार धकराव, संदीप चव्हाण, विशाल दळवी, जालिंदर माने, दत्तात्रय हिंगडे चालक संभाजी कोतकर यांनी नाशिक येथील पोलिसांच्या मदतीने आरोपींचे लोकेशन ट्रेस करून त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता हे हत्याकांड कौटुंबिक वादातून झाले असल्याचे समोर आले आहे. आरोपी सुरेश निकम हा संगमनेरच्या असून सावळीविहीर येथे मयत पत्नी हीचे माहेर सावळीविहीर होते, मात्र काही दिवसांपूर्वी सासुरवाडीत सुरेश निकम याचे वाद झाले होते आणि त्याचाच मनात राग धरून काल रात्री मोटारसायकलवरून सुरेश निकम व त्याचा चुलत भाऊ याने सावळीविहीर येथे रात्री साडे अकराच्या सुमारास येऊन घराचा दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडताच दोनही आरोपींनी धारदार शस्त्राने वार करण्यास सुरुवात केली. काही कळायच्या आत हे हत्याकांड करून ते पसार झाले. मात्र अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मोठी आरडाओरड सुरू झाली. शेजारील लोक मदतीसाठी धावून आले व हल्ल्यातील सर्व सहा जणांना शिर्डी येथे सुपर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन गेले, मात्र उपचारापूर्वीच तिघांचा मृत्यू झाला होता. तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. आरोपी सुरेश विलास निकम व रोशन कैलास निकम या दोघानाही अटक करण्यात आली असून त्यांच्यावर शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये भा.द.वि.कलम 302, 307, 506 व 34 प्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सावळीविहीर गावात एकच खळबळ उडाली आहे.

COMMENTS