Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोल्यामध्ये ट्रकच्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू

अकोला ः जिल्ह्यातील पातूर तालुक्यात भरधाव ट्रकने बाईकला धडक दिली. या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या काळीज पिळवटून टाकणार्‍या घटनेने पर

भाविकाचा अपघातात मृत्यू; पाच जण जखमी
वारकर्‍यांवर काळाचा घाला ; अपघातात 5 जणांचा मृत्यू
आमदार दळवी यांच्या गाडीचा अपघात

अकोला ः जिल्ह्यातील पातूर तालुक्यात भरधाव ट्रकने बाईकला धडक दिली. या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या काळीज पिळवटून टाकणार्‍या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोला जिल्हातल्या पातूर तालुक्यातील शिर्ला येथे भरधाव मिनी ट्रकने बाईकला जबर धडक दिल्याने पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. अकोला ते नांदेड महामार्गावरुन हे दोघेही शेतातून आपल्या घराकडे जात होते. यावेळी शिरला फाट्या जवळ त्यांच्या बाईकला भरधाव मिनी बसने जोरदार धडक दिली. या धडकेत पुंडलिक निमकंडे आणि रत्ना निमकंडे या शेतकरी दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला.

COMMENTS