पुणे/प्रतिनिधी : वीकेंडच्या आलेल्या सुट्टया आणि मंगळवारी गणेशोत्सवाची असलेली सुटी यामुळे अनेक गणेशभक्त आणि चाकरमानी आपल्या घराच्या दिशेने जात असल
पुणे/प्रतिनिधी : वीकेंडच्या आलेल्या सुट्टया आणि मंगळवारी गणेशोत्सवाची असलेली सुटी यामुळे अनेक गणेशभक्त आणि चाकरमानी आपल्या घराच्या दिशेने जात असल्याचे चित्र आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर चाकरमानी आणि गणेशभक्त घराबाहेर पडल्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. खालापूर टोलनाका ते कुंभवली पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गणेशोत्सवासाठी निघालेल्या नागरिकांना यांचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सलग सुट्ट्या आणि गणेशोत्सवासाठी अनेक भाविक आणि चाकरमानी घराच्या दिशेने निघाले आहे. त्यामुळे मुंबईसह पुण्यात रेल्वेस्टेशन, बसस्टँड आणि खाजगी वाहने फुल्ल झाली आहे. त्यातच आता मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाटात तुफान वाहतूक कोंडी झाली आहे. बोरघाटात वाहनांची गर्दी झाल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. घरी निघालेल्या चाकरमान्यांना पोहचण्यास उशीर होत आहे. वाहतूक कोंडी झाल्याची माहिती समजताच पोलिसांनी तातडीने बोरघाटात धाव घेतली असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहे. वीकेंड असल्याने अनेकांनी सुट्टी टाकत गणेशोत्सवासाठी घरी जाणे पसंत केले आहे. त्यामुळे शनिवारी रात्रीपासून मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. तर रविवारी सकाळी आठ वाजेपासून मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक संथ झाली असून त्यामुळे वाहनचालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. खाजगी वाहनांची संख्या अचानक वाढल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर आता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. मंगळवारपासून गणेश चतुर्थीची सुरुवात होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात अनेकांनी सुट्टी टाकत कुटुंबियांसोबत गणपती उत्सव साजरा करण्याचे नियोजन आखले आहे. पुणे आणि मुंबईतील नागरिक गणेशोत्सवासाठी आपापल्या घरी निघाले आहे. एकाचवेळी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वाहनांची संख्या वाढल्याने तुफान वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत सार्वजनिक वाहनांची प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.
COMMENTS