Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवमतदारांनी केले खासदार डॉ.सुजय विखे स्वागत

पाथर्डी प्रतिनिधी - बाबूजी आव्हाड महाविद्यालयात नुकतेच नव मतदार झालेल्या विद्यार्थ्यांनी अहमदनगरचे लोकप्रिय खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे स्वा

अहिल्यादेवींच्या नावाला नव्हे, तर बाहेरच्या हस्तक्षेपाला विरोध
लोकांचे कैवारी बनणाऱ्यांची प्रतिमा येणाऱ्या निवडणुकीत सर्वांसमोर आणू ; खासदार डॉ. सुजय विखे
विखेंच्या नाकाखालील डोंगर पोखरला, खासदार झाले संतप्त

पाथर्डी प्रतिनिधी – बाबूजी आव्हाड महाविद्यालयात नुकतेच नव मतदार झालेल्या विद्यार्थ्यांनी अहमदनगरचे लोकप्रिय खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे स्वागत केले. मतदान हा आपल्या राज्यघटनेने दिलेला महत्त्वाचा अधिकार असून या अधिकाराचा वापर प्रत्येक नवमतदार विद्यार्थ्यांनी करावा व आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडावे. आपल्या देशाने लोकशाही स्वीकारली असून ही पद्धती अजूनही टिकून ठेवली आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही शासनपद्धती असणारा देश असून संविधानाने अनेक सुविधा, अधिकार व हक्क  नागरिकांना दिले आहेत. म्हणून प्रत्येक नवमतदार विद्यार्थ्यांनी आपले मतदान करावे असे आवाहन यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  जी पी ढाकणे यांनी केले.

 स्वागतप्रसंगी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.पी. ढाकणे, विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार नवमतदार विद्यार्थिनी वैभवी आव्हाड हिने मांडले

COMMENTS