Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात पावसाचा जोर वाढणार

नाशिक पुण्यासह 29 जिल्ह्यांना यलो अलर्ट

पुणे/प्रतिनिधी: गेल्या ऑगस्ट महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाला राज्यात सुरूवात झाली आहे.मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या

विठ्ठल-रुक्मिणी पूजेची आता घरबसल्या बुकिंग
करंजीत अखंड हरीनाम सप्ताहाची जल्लोषात सांगता
सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी पकडला १३० किलो गांजा

पुणे/प्रतिनिधी: गेल्या ऑगस्ट महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाला राज्यात सुरूवात झाली आहे.मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासांपासून जोरदार पाऊस होत असल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्येही दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईकर सुखावले आहे. परंतु आता पुढील एक ते दोन दिवसांत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
राज्यातील तब्बल 29 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि विदर्भातील अकोला, बुलढाणा, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांत जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरीत मात्र पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पावसाचा अंदाज पाहून प्रवासाची तयारी करावी, तसेच शेतकर्‍यांनी हवामान अंदाज घेत शेतीच्या कामांना सुरुवात करण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

COMMENTS