Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एअर होस्टेसचा खून करणार्‍या आरोपीची आत्महत्या

मुंबई/प्रतिनिधी : मुंबईत पवई येथे 24 वर्षीय ट्रेनी एअर होस्टेस रुपल ओग्रे हिचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी विक्रम अटवाल (वय 35) या

मराठा आरक्षणासाठी एकाची आत्महत्या
एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या
इंदूरमध्ये 12 वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

मुंबई/प्रतिनिधी : मुंबईत पवई येथे 24 वर्षीय ट्रेनी एअर होस्टेस रुपल ओग्रे हिचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी विक्रम अटवाल (वय 35) याने पोलिस कोठडीत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्याने स्वतःच्या पँटच्या साहाय्याने गळफास घेतला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. अंधेरी पूर्वेच्या मरोळ परिसरातील एनजी को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीत तो हाउस कीपिंगची कामे करायचा.
मृत एअर होस्टेस रुपल हिच्या घरी देखील तो काम करायचा. मात्र, काम करत असतांना रुपल ओग्रे हिच्यासोबत तिचा सतत कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून वाद होत असे. याच रागातून त्याने रुपलचा खून केला असावा, असे बोललं जात आहे. खुनानंतर रक्ताने माखलेले स्वत:चे कपडे आणि खून करण्यासाठी वापरलेला चाकू त्याने सोसायटी जवळच्या झुडुपात टाकला होता. त्यानंतर तो तिथून पसार झाला होता. रुपल ओग्रे ही मूळची छत्तीसगडची होती. ती एअर इंडियामध्ये प्रशिक्षणासाठी मुंबईत आली होती. तिच्या चुलत भावाचा मित्र तिला भेटण्यासाठी घरी आला असताना तिचा खून झाल्याचे आढळून आले होते. रुपल अर्धवट नग्नावस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या मानेवर धारदार शस्त्राने चिरल्याच्या जखमा होत्या. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास करून विक्रम अटवाल याला अटक केली होती. आज सकाळी त्याने गळफास लावून आत्महत्या केली. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. विक्रम अटवाल यांच्या आत्महत्येमुळे रुपल ओग्रे हिच्या खुनाचे गूढ वाढले आहे. विक्रम अठवाल हा विवाहित होता. त्याला दोन मुली आहेत. असे असताना त्याने रुपलचा खून का केला याचा तपास पोलिस करत होते. मात्र अठवालने आत्महत्या केल्याने हे गूढ वाढले आहे.

COMMENTS