भातकुडगाव फाटा/प्रतिनिधीः गेल्या दोन महिन्यापासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. पावसाअ
भातकुडगाव फाटा/प्रतिनिधीः गेल्या दोन महिन्यापासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. पावसाअभावी पिके जळू लागल्याने शासनाने सरसकट नुकसान भरपाई जाहीर करून शेतकर्यांच्या खात्यात पैसे वर्ग करावे. या मागणीसाठी जनशक्तीच्या नेत्या जि.प.सदस्या हर्षदा काकडे यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढून तहसीलदारांना पावसाअभावी जळून चाललेली बाजरी, कपाशी, मुग, सोयाबीन आदी पिकांची भेट देऊन अनोखे आंदोलन करण्यात आले.
यावेळी त्या बोलत होत्या.मंगळवारी, दि.05सप्टेंबर रोजी जनशक्ती विकास आघाडी शेवगाव-पाथर्डी च्या वतीने तहसील कार्यालय शेवगाव यांचे समोर शेतकर्यांनी जळालेली पिके तहसिलदार प्रशांत सांगडे यांना सस्नेह भेट देऊन अनोख्या प्रकारचे आंदोलन केले. यावेळी अॅड.शिवाजीराव काकडे, जगन्नाथ गावडे, कॉ.राम पोटफोडे, राजू पातकळ, अशोक पातकळ, गणेश धावणे, भाऊसाहेब फटांगरे, माणिक गर्जे, सुरेश चौधरी, राजेंद्र पोटफोडे, गणपत फलके, शेषराव फलके, देविदास गिर्हे, पांडुरंग गरड, रविंद्र कणके, बाळासाहेब पाटेकर, रघुनाथ सातपुते, विनोद पवार, अण्णा काळे, आबासाहेब मोरे, ज्ञानेश्वर शेटे, राधाकिसन शिंदे, सुरेश काजळे, बाळासाहेब काकडे, प्रल्हाद पुंडे, अर्जुन धोरकुले, डॉ.संतोष घनवट, आदिनाथ झिरपे, भाऊसाहेब बर्डे, भाऊसाहेब पोटभरे, आसाराम शेळके, अशोक ढाकणे, अकबर शेख, सुनील दारकुंडे, रज्जाक शेख, वैभव पूरनाळे, दादा सातपुते, विष्णू दिवटे, संदेश खरात, मनोज घनवट, भारत लांडे, भाऊसाहेब राजळे, सुनिल गवळी, रघुनाथ सातपुते, नवनाथ साबळे, जालिंदर कापसे, मनोज घोंगडे, शिवाजी औटी, भागचंद कुंडकर आदि यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलतांना हर्षदा काकडे म्हणाल्या की, सुरवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकर्यांनी लाखोंचा खर्च करून पिके घेतली. ऐन पिकांची वाढ चालू झाली व पाऊस लांबल्याने सर्व पिके जळू लागली आहेत. कधी नव्हे एवढी भीषण परिस्थिती तालुक्यात निर्माण झाल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला असल्याने शेतकर्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. शासन देखील यामध्ये बघ्याची भूमिका घेत आहे. वास्तविक पाहता शासनाने या विपरीत परिस्थितीत ताबडतोब शेतकर्यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करून दुष्काळ जाहीर करावा. शेतकर्यांना अर्थसहाय्य देऊन जनावरांच्या दावणीवरच चारा द्यावा. यावेळी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध करून आंदोलकांना जनशक्तीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. याप्रसंगी माणिक गर्जे, विष्णू दिवटे, अशोक पातकळ, भाऊसाहेब पोटभरे आदींची भाषणे झाली.
-प्रतिक्रिया ः जर शासनाने आमचे मागणीचा विचार केला नाही. तर तालुक्यात एकाच दिवशी एकाच वेळी प्रत्येक गावामध्ये सरकारी अधिकारी कर्मचार्यांना घेरावो आंदोलन करण्यात येईल.- हर्षदा काकडे. नेत्या, जनशक्ती विकास आघाडी.
COMMENTS