Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात पुढील 10 दिवस जोरदार पावसाची शक्यता

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात मान्सूनचे पुनरागमन झाले असले तरी, अजूनही अनेक जिल्हे आणि तालुके कोरडेच असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. मात्र राज्यात आगामी

पती-पत्नीचा वाद ; दोघांनीही रॉकेल ओतून घेतले पेटवून | LOKNews24
आईच्या डोळ्यादेखत मुलाचं भयानक कृत्य
सहा वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात मान्सूनचे पुनरागमन झाले असले तरी, अजूनही अनेक जिल्हे आणि तालुके कोरडेच असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. मात्र राज्यात आगामी 10 दिवस म्हणजे 10 सप्टेंबरपर्यंत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र निर्मिती होऊन ते वायव्येकडे भूभागावर सरकणार आहे. त्यामुळे या दोन प्रणालींमुळे मंगळवार, 5 सप्टेंबरपासून पुढील 10 दिवस म्हणजे 15 सप्टेंबरपर्यंत राज्यात चांगल्या पावसाचा अंदाज आहे.
पश्‍चिम, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मध्यम ते मुसळधार तर मुंबईसह कोकण व विदर्भात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे. तथापि, मराठवाडा आणि विदर्भावर दुष्काळाचे सावट आहे. पावसाअभावी पिकांनी माना टाकल्या असल्याचे चित्र आहे. पुढील पाच दिवस राज्यात काही भागांमध्ये पाऊस जोरदार हजेरी लावणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर विदर्भात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आज आणि उद्या विदर्भाच्या काही भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या पट्ट्याने मान्सून परतणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

COMMENTS