Homeताज्या बातम्यादेश

तलावात बुडून ५ मुलांचा मृत्यू

बिहार प्रतिनिधी - बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. रक्षाबंधन करुन पोहायला गेलेल्या पाच भावंडाचा दुर

मराठवाडा कार्यकारिणीवर जालिंदर धांडे, शुभम खाडे, आनंद डोंगरे
क्रिकेटचे सामन्याने नाही तर विकासाच्या कामाने शुभारंभ ; माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड
विद्युत वाहनांना मंत्र्यांचीच नकारघंटा

बिहार प्रतिनिधी – बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. रक्षाबंधन करुन पोहायला गेलेल्या पाच भावंडाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना सोनारचक गावात उघडकीस आली. ही पाचही मुले राखी बांधून झाल्यानंतर पोहायला गेली असता ही ह्रदयद्रावक घटना घडली. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील सोनारचक गावामध्ये राखी पोर्णिमेच्या सणादिवशीच दुर्देवी घटना घडली. गावातील पाच मुले रक्षाबंधन करुन गावाशेजारच्या एका डोहात पोहायला गेली होती. यावेळी त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने पाचही जण पाण्यात बुडाले. परिसरातील गुरे चारणाऱ्या लोकांना मुलांची कपडे दिसल्याने संशय आला. ज्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. मुलांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

COMMENTS