Homeताज्या बातम्यादेश

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर, ऑक्सिजन असल्याचे पुरावे; इस्त्रोने दिली मोठी अपडेट

बंगळुरू प्रतिनिधी - भारताचं चांद्रयान-३ मोहिमेचं विक्रम लँडरचं सॉफ्ट लँडिंग व्यवस्थित झाली आहे. विक्रम लँडरमधील प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष

प्रकाशच्या कोरोना योध्दांना न्यायालयाचा दिलासा अंतिम अटकपुर्व जामीन मंजुर
सज्जनगडावर लवकरच रोप-वे; 10 कोटींचा निधी मंजूर
सातारच्या मेडिकल कॉलेज प्रवेश प्रक्रियेस परवानगी; 100 विद्यार्थ्यांना मिळणार एमबीबीएसला प्रवेश

बंगळुरू प्रतिनिधी – भारताचं चांद्रयान-३ मोहिमेचं विक्रम लँडरचं सॉफ्ट लँडिंग व्यवस्थित झाली आहे. विक्रम लँडरमधील प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत आहे. याचदरम्यान, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर, ऑक्सिजनचे पुरावे मिळाले आहेत. तर हायड्रोजनचा शोध सुरू आहे इस्त्रोने ट्विटरवर पोस्ट करत माहिती दिली आहे. इस्त्रोने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर वैज्ञानिक शोध सुरुच आहे. प्रज्ञान रोव्हरवरील लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप इन्स्ट्रुमेंटद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फरचे पुरावे आढळले आहेत’ विक्रम लँडरमधील प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत आहे. याचदरम्यान, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर, ऑक्सिजनचे पुरावे मिळाले आहेत. तर हायड्रोजनचा शोध सुरू आहे.

COMMENTS