केज प्रतिनिधी - केज तालुक्यात आज पहायला गेले तर दुष्काळ पडला आहे . शेतकरी ऐक तर या चिंतेने व्याकुळ झाला आहे आपली गुरे ढोरे ,पोटाची खळगी भरण्यासाठ
केज प्रतिनिधी – केज तालुक्यात आज पहायला गेले तर दुष्काळ पडला आहे . शेतकरी ऐक तर या चिंतेने व्याकुळ झाला आहे आपली गुरे ढोरे ,पोटाची खळगी भरण्यासाठी रात्र दीवस झटपट करत आहे.त्यांत केज व अंबाजोगाई महावितरण कंपनीने धिंगाणा घातला आहे काही शेतकर्यांच्या शेतात बोअरवेल आहेत.विहीरीला थोडे थोडे पाणी आहे त्या पाण्यावर अवलंबून शेतकर्यांनी आपल्या जनावरांना चारा मिळावा म्हणून चार्याची सोय करत आहेत.परंतु त्या चार्याला पानी देण्यासाठी विहीरीत, बोलमध्ये टाकलेल्या मोटर या लाईट वर चालतात परंतु केज-आंबाजोगाई महावितरण कंपनीचा सावळा गोंधळ चालला आहे त्यामुळे शेतकर्यांच्या मोटरला प्रथम व्होल्टेज पाहिजे तेवढे मिळत नाही त्यांच शेतकर्यांच्या शेतावर असलेला डीपी जळतो तो जळालेला डीपी शेतकर्यांने महावितरण कंपनी आंबाजोगाई यांच्या कडे दुरूस्ती करण्यासाठी दीला तर तो डीपी शेतकर्यांना वेळेवर भेटत नाही.जरी भेटला तरी तो डीपी लोड देण्याआधी जळुन जातो .ऐका ऐका ठीकानचा डीपी तीन वेळा जळतो तर महावितरण कंपनीचे अधिकारी काय गोट्या खेळायला आहेत का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.तसेच केजचे डीवाय अधिकारी यांना कुणी विचारले असे का होते तर ते बोलतात माझ्या हातात काही नाही वरीष्ठांना विचारा व वरीष्ठांना विचारले तर ते बोलतात तुमच्या अधिकार्यांना विचार अशा प्रकारे केज तालुक्यातील शेतकर्यांना टोलवाटोलवी उत्तरे दिली जातात.मग केज व अंबाजोगाई महावितरण कंपनीचे अधिकारी काय करतात असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.या सावळ्या गोंधळात शेतकर्यांचे पीके जळुन राख होत आहेत.त्यांमुळे केज तालुक्यातील शेतकरी केज व अंबाजोगाई महावितरण कंपनी वर संतप्त झाले आहेत.व त्यांत महावितरण कंपनी राजकारण करत आहे.कुठल्यातरी भंगार नेत्यांच्या मनावर अंबाजोगाई महावितरण कंपनी चालते अशी नागरिकांन मध्ये चर्चा सत्र सुरू झाले आहे व परंतु नागरिकांनी असे व्यक्त केले आहे की महावितरण कंपनी त्या नेत्याची जहागीर आहे का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.परंतु अंबाजोगाई -केज या महावितरण कंपनीचा सावळ्या गोंधळाला कुठे तरी वरीष्ठअधिकारी यांनी आळा बसवला पाहिजे अशी मागणी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
COMMENTS