Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्रामसभेतच अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, एकाविरुद्ध गुन्हा

लातूर प्रतिनिधी - तालुक्यातील बिरवली ग्रामपंचायतअंतर्गत झालेल्या विकासकामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार गटविकास अधिकार्‍याकडे केली. मात्र, त्याची

शेतीतील मागासलेपण सहकार क्षेत्रच दूर करु शकते : गडकरी
मेहेरबाबांच्या आगमन शताब्दीनिमित्त काढली शोभायात्रा
कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे 14.52 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन

लातूर प्रतिनिधी – तालुक्यातील बिरवली ग्रामपंचायतअंतर्गत झालेल्या विकासकामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार गटविकास अधिकार्‍याकडे केली. मात्र, त्याचीही चौकशी झाली नाही. याबाबत माहिती अधिकाराखाली विचारणार्‍या राजेंद्र बळीराम कांबळे यांना सरपंच, ग्रामसेवकांनी माहिती दिली नाही. याप्रकरणी सोमवारी झालेल्या ग्रामसभेत कांबळे यांनी अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपसरपंचांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी राजेंद्र कांबळे यांना भादा पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले, बिरवली ग्रामपंचायतीच्या वतीने नियमबाह्य पद्धतीने विकासकामे केल्याचा आरोप केला असून, याची चौकशी करावी अशी मागणी तक्रारदार कांबळे यांनी केली आहे. एकाही कामावर फलक बसविण्यात आला नाही. शिवाय, संबंधितांनी याबाबत चौकशी केली नाही. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सोमवारी गावात झालेल्या ग्रामसभेत राजेंद्र कांबळे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. याबाबत त्यांनी चार दिवसांपूर्वीच आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. तर संबंधित तक्रारदार विकासकामामध्ये अडथळा निर्माण करतो. माहिती विचारली म्हणून मी धमकी दिली, हा आरोप चुकीचा आहे, असे प्रवीण चव्हाण म्हणाले.

COMMENTS