कळमनुरी प्रतिनिधी - शिंदे गटाचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कावड यात्रेत तलवार फिरवल्याने त्य

कळमनुरी प्रतिनिधी – शिंदे गटाचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कावड यात्रेत तलवार फिरवल्याने त्यांच्यावर कळमनुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीत जाहीर सभा घेतली होती. या सभेतून त्यांनी संतोष बांगर यांच्यावर जोरदार टीका केली होती. गद्दाराची नाग समजून पूजा केली. पण, हा नाग उलटा फिरून डसायला लागला. साप पायाखाली आल्यावर काय करायचं तुम्हाला कळतं. पुंगी वाजवली, दूध पाजलं, सगळं वाया गेलं, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी आमदार संतोष बांगर यांनी कावड यात्रा काढली होती. या यात्रेला हजारो कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. यावेळी बांगर यांनी रस्त्यावर उतरून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. इतकंच नाही, तर एका शिवभक्ताने आमदार संतोष बांगर यांचा सत्कार करत त्यांना तलवार दिली होती. यावेळी बांगर यांनी म्यानातून ती बाहेर काढत हवेत भिरकावली. याप्रकरणी कळमनुरी पोलिसांनी बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांची परवानगी न घेता डीजे लावून गर्दी करत धिंगाणा घातला तसेच तलवारही नाचवली, असं पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे
COMMENTS