Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांना 25%  टक्के अग्रीम पिक विमा रक्कम तात्काळ देण्यात यावी-अनिल जगताप

पीक विमा कंपनीला बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा

बीड प्रतिनिधी - ऑगस्ट महिन्यामध्ये सलग 30 दिवसापासून पावसाचा खंड पडल्याने शेतकरी हवालदिल झाला असून या शेतकर्‍यांना पिक विम्याचे 25%  टक्के अग्रीम

भक्ताडाला हौस असेल, तर, होऊन जाऊ द्या चौकशी, भुजबळांची अन् आमचीही ! 
Solapur : ट्रक आणि मोटारसायकलचा भीषण अपघात (Video)
केंद्रीयमंत्री रामदास आठवले गुरुवारी नाशिक दौऱ्यावर

बीड प्रतिनिधी – ऑगस्ट महिन्यामध्ये सलग 30 दिवसापासून पावसाचा खंड पडल्याने शेतकरी हवालदिल झाला असून या शेतकर्‍यांना पिक विम्याचे 25%  टक्के अग्रीम रक्कम तात्काळ देण्यात यावी. याबरोबरच बीड तालुक्यातील पाली, येळंबघाट, नाळवंडी घाटसावळी, म्हाळसजवळा, कुर्ला मंडळातील शेतीचा पंचनामा करून शेतकर्‍यास 25% अग्रीम पिक विमा देण्यापासून वंचित ठेवू नये अन्यथा बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने शेतकर्‍यांसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बीड शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप यांनी पीक विमा कंपन्यांना दिला आहे.  
सन 2023 मध्ये जुलै महिन्यात बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी एक रुपयात पीक विमा भरून घेतला. यामध्ये प्रमुख पिके कापूस, सोयाबीन, मूग, उडीद,  भुईमूग, तूर, बाजरी ईत्यादी आहेत. हा पीक विमा भरून घेताना शेतकर्‍यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. ग्रामीण भागात इंटरनेटच्या रेंजअभावी कधी सरवर डाऊन असायचे तर कधी लाईटचा प्रॉब्लेम असायचा. अशा अनेक अडचणींना सामोरे जात शेतकर्‍यांनी आपल्या पिकाचा विमा उतरवला. यावर्षी सुरुवातीला काहीशा प्रमाणात पाऊस पडल्याने शेतकर्‍यांनी कापूस, सोयाबीन, मूग, उडीद व इतर पिकांची पेरणी केली. परंतु चालु महिन्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने सलग 30 दिवस दांडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. पिकांना जी फुलधारणा होणार होती ती झालीच नाही. पावसाच्या खंड पडत राहिल्याने परिणामे पिके करपून चालली आहेत. या पिकांना पाऊस असणे फार गरजेचे असते. बीड जिल्ह्यातील बहुतेक मंडळात पर्जन्यमापक उपलब्ध नाही. मग पर्जन्य मापणी कशी करायची हा शेतकरी वर्गाला प्रश्न पडला आहे. पर्जन्यमापक नसल्यामुळे पावसाची चुकीची आकडेवारी दर्शून शेतकर्‍यांची दिशाभूल करण्याचे काम सुरु आहे किंबहुना शेतकर्‍यांना फसवण्याचे षडयंत्र रचल्या जात आहे. शेतकर्‍यांना विनाकारण त्रास न देता तात्काळ 25% अग्रीन पीक विमा रक्कम देण्यात यावी याचबरोबर दुष्काळाच्या ज्या योजना आहेत त्या राबवाव्यात. अन्यथा बीड शिवसेनेच्या वतीने जिल्हाभरात पीक विमा कंपन्यांच्या विरोधामध्ये शेतकर्‍यांसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बीड शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप यांनी दिला आहे.
पर्जन्यमापक यंत्र उपलब्ध नसलेल्या मंडळातील शेतकर्‍यांवर अन्याय होता कामा नये
बीड जिल्ह्यातील कित्येक मंडळात पावसाचे मोजमापन करणारे पर्जन्यमापक यंत्र उपलब्ध नसल्याने शेजारच्या मंडळाच्या आकडेवारीवर अवलंबून राहावे लागते.  काही मोजक्या मंडळात यंत्र असल्याकारणाने त्याच्या निष्कर्षावरच बाकीच्या मंडळाचे ठरवल्या जातात. यामुळे यंत्र उपलब्ध नसलेल्या मंडळातील शेतकर्‍यांवर अन्याय होतो. पीक विमा कंपनीने या शेतकर्‍यांची दखल घेऊन त्या शेतकर्‍यांचा विचार करणे महत्वाचे असून प्रत्येक मंडळातील शेतकरी बांधवांना तात्काळ 25% अग्रीन पीक विमा रक्कम देण्यात यावी.

COMMENTS