Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लातूर जिल्हा बँकेच्या आर्थिक मदतीने युवक शेतकरी झाला रेशीमचा यशस्वी उद्योजक

लातूर प्रतिनिधी - लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतीपूरक व्यवसायांच्या अंतर्गत तुती लागवड व रेशीम उद्योगासाठी 2017 पासून बिनव्याजी कर्जे

आमदार आत्रताप्रकरणी नार्वेकरांना सर्वोच्च नोटीस
चिखलीच्या पोलीस उपनिरीक्षकाला का अटक झाली? पहा ‘माझं गाव, माझी बातमी’ | LokNews24
अपघाताला कारणीभूत ठरणारे ब्लॅक स्पॉट तातडीने दूर करावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लातूर प्रतिनिधी – लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतीपूरक व्यवसायांच्या अंतर्गत तुती लागवड व रेशीम उद्योगासाठी 2017 पासून बिनव्याजी कर्जे 2 लाख रुपयांपर्यंत पुरवठा सुरू केला असून त्याचा जिल्ह्यातील अनेक शेतक-यांनी लाभ घेतला आहे त्यामुळे तुती लागवडीत वाढ झाली आहे. पूर्वी लातूर जिल्ह्यात चॉकी सेंटर नसल्याने चॉकी (अंडीपुंज) साठी रेशीम उद्योजकांना रेशीम उद्योगासाठी लागणा-या अळ्या (चॉकी) कर्नाटकातून मागवाव्या लागत असत. आता मात्र मराठवाड्यातील रेशीम उद्योजकांना अळा गादवड येथील चॉकी सेंटरमध्ये उपलब्ध आहेत.
लातूर जिल्हा बँकेच्या वेगवेगळ्या योजनांतून अनेक उद्योग उभे राहिलेले असताना आता यशस्वी रेशीम उद्योजक शेतकरी आकाश जाधव जिल्हा बँकेकडून मिळालेल्या आर्थिक मदतीने यशस्वी उद्योजक म्हणून उभा राहिला आहे. आज दरमहा सव्वा लाख रुपयांची उलाढाल व खर्च वजा जाता दरमहा 80 हजार रुपये उत्पन्न मिळवत यशस्वी उद्योजक तयार झाला आहे. लातूर जिल्ह्यातील गादवड येथील आकाश जाधव या तरुण शेतक-याने सुरुवातीला जिल्हा बँकेकडून रेशीम लागवडीसाठी बिनव्याजी 2 लाख रुपये कर्ज घेतले व ते मुदतीत फेडले. पुन्हा चॉकी सेंटरसाठी 12 लाख रुपये कर्ज घेतले आणि त्याची उभारणी केली. यातून आज नवीन उद्योजक तयार झाला. या चॉकी सेंटरमुळे मराठवाड्यातील रेशीम उद्योजकांना अंडीपुंजासाठी बंगळुरू येथे जावे लागत असे. आता मात्र लातूर जिल्ह्यातील पहिले चॉकी सेंटर गादवड येथे उभे राहिल्याने रेशीम उद्योजक येथे खरेदीसाठी येत उलाढाल सुरू झाली आहे. या चॉकी सेंटर व रेशीम उद्योगाची जिल्हा बँकेचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपराव देशमुख व जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी पाहणी केली व समाधान व्यक्त केले. जिल्हा बँक सभासद शेतक-यांना कर्ज पुरवठा करून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती राज्याचे माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख, जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धिरज देशमुख यांनी यावेळी बोलताना दिली तसेच नवीन उद्योजक आकाश जाधव याचेही कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. राज्यात नावलौकिक असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील शेतक-यांना, सहकारी संस्था, पतसंस्था, पगारदार कर्मचा-यांना आर्थिक मदत करून जिल्ह्यातील लोकांसाठी मातृत्वाची भूमिका बजावली आहे. जिल्हा बँक माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व बँकेचे अध्यक्ष आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असून राज्यात वेगळेपण जपलेले आहे. गादवड येथील जिल्हा बँकेकडून रेशीम उद्योग व चॉकी सेंटरला आर्थिक मदत मिळालेला आकाश जाधव दरमहा 1 लाख 25 ते 30 हजार रुपयांची उलाढाल करीत असून त्यात खर्च वजा होता त्यांना साधारणत: 75 ते 80 हजार रुपये दरमहा उत्पन्न मिळत आहे. अशी माहिती आकाश जाधव यांनी दिली.

COMMENTS