श्रीरामपुरात बिबट्याचा तरुणांवर हल्ला ….

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीरामपुरात बिबट्याचा तरुणांवर हल्ला ….

शहरातील वार्ड नं.०७ सुर्यनगर या भागातील बिबट्याचे दर्शन घडल्याची घटना ताजी असतांनाच श्रीरामपूर तालुक्यांतील सरला बेट परिसरातील गोवर्धन गाव येथील ऋषीकेश चव्हाण या मोटारसायकल वरून जाणाऱ्या तरुणावर बिबट्याचा हल्ला केल्याची घटना सोमवारी (दिनाक 21 )सायं ०८ वाजता घडली.  

राष्ट्रीय स्पर्धेत संजय आनंदकर स्पोर्ट्स अकॅडमीचे यश
करंजी पढेगाव परिसरातील बाधितांना तात्काळ मदत करावी ः जाधव
अंगणवाडी सेविकांचा 20 फेबु्रवारीपासून बेमुदत संप

श्रीरामपूर – शहरातील वार्ड नं.०७ सुर्यनगर या भागातील बिबट्याचे दर्शन घडल्याची घटना ताजी असतांनाच श्रीरामपूर तालुक्यांतील सरला बेट परिसरातील गोवर्धन गाव येथील ऋषीकेश चव्हाण या मोटारसायकल वरून जाणाऱ्या तरुणावर बिबट्याचा हल्ला केल्याची घटना सोमवारी (दिनाक 21 )सायं ०८ वाजता घडली.  

यामुळे या गावात बिबट्याची पुन्हा भिती निर्माण झालेली आहे.गोदावरी नदी परिसर असल्याने पूर्वीही या परिसरात बिबट्याचा वावर होता.  येथील शेतकरी बापु जगताप यांच्या उसाजवळ एक चपळ बिबट्या हा लिंबाखाली बसलेला होता; त्यावेळेस ऋषी चव्हाण हा दुध घालून घरी परत जात असताना त्याच्या गाडीवर झेप घेवुन बिबट्याने हल्ला केला. तरी सर्व ग्रामस्थांनी काळजी घ्यावी ही नम्र विनंती गावातील नेतेमंडळींनी केली आहे.

COMMENTS