चांदवड प्रतिनिधी - चांदवड येथील 20 जणांच्या शिष्टमंडळाने दि 25 ऑगस्ट 2023 रोजी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत मौदा नगरपंचायत जि नागपूर येथे भेट देऊन
चांदवड प्रतिनिधी – चांदवड येथील 20 जणांच्या शिष्टमंडळाने दि 25 ऑगस्ट 2023 रोजी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत मौदा नगरपंचायत जि नागपूर येथे भेट देऊन विविध प्रकल्प जसे की घनकचरा प्रकल्प,कचऱ्यापासून खत निर्मिती अश्या विविध युनिटची पाहणी केली.मौदा नगरपंचायत स्वच्छता अभियंता व कर्मचारी यांनी चांदवडहुन गेलेल्या शिष्टमंडळास अतिशय छान माहिती समजून सांगितली.यात विशेषकरून कचऱ्यापासून खत निर्मिती करताना इतर कचऱ्याची कशी विल्हेवाट केली जाते त्यापासून आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनीस काही धोका आहे का?अश्या अनेक शंका नागरिकांच्या मनात होत्या याबाबतीत चांदवडहुन गेलेले श्री सुधीर कबाडे, श्री अंबादास आहेर यांना असलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे स्वच्छता अभियंता यांनी दिली.प्रत्येक युनिटची सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी शिष्टमंडळात चांदवड नगरपरिषद मुख्याधिकारी श्री रमाकांत डाके,जेष्ठ नागरिकअशोककाका व्यवहारे,मोहन शर्मा,प्रथम नगराध्यक्ष श्रीभूषण कासलीवाल,निलेश गुजराथी,रिजवान घासी, शेतकरी अंबादास आहेर,सुधीर कबाडे,प्रकाश शेळके,अंकुर कासलीवाल यांचेसह संदीप महाले,अतुल खंडागळे,कापडणीस साहेब,मच्छिंद्र जाधव, पत्रकार देविदास जाधव,महेंद्र गुजराथी,नितीन फंगाळ, धनंजय पाटील,उदय वायकोळे आदी उपस्थित होते.
COMMENTS