Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोहन गायकवाड यांनी केला शरणपूर वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा.

जेष्ठ पत्रकारांच्या हस्ते वृध्दांना दिले स्नेहभोजन

नेवासाफाटा/प्रतिनिधीः नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन गायकवाड यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त होणार्‍या खर्चाला फाटा देत समाज प्रति असलेली जाणीव दा

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू l पहा LokNews24
आमदार डॉ. लाहमटे यांच्या जनता दरबारातून अनेकांचे प्रश्‍न मार्गी
पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा फडकविणारच ः मुख्यमंत्री शिंदे

नेवासाफाटा/प्रतिनिधीः नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन गायकवाड यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त होणार्‍या खर्चाला फाटा देत समाज प्रति असलेली जाणीव दाखवत  आगळावेगळा उपक्रम राबवित आपल्या वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत खडका फाटा रस्त्यावरील शरणपूर वृद्ध आश्रमात जेष्ठ पत्रकार बांधवांच्या हस्ते वयोवृद्ध आजी-आजोबांना स्नेहभोजन केले. याप्रसंगी पावसाळी छत्र्यांचे वाटप करून अनोख्या पध्दतीने वाढदिवस साजरा केला.
  याप्रसंगी व्यासपीठावर प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष गुरूप्रसाद देशपांडे,शरणपूर वृद्ध आश्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब देवखिळे, एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण पुरोहित, केंद्रीय पत्रकार संघाचे राज्य प्रभारी कमलेश गायकवाड, जेष्ठ पत्रकार अशोक डहाळे, कैलास शिंदे, उपस्थित होते. यावेळी वयोवृद्ध नागरिकांना एक मदतीचा हात म्हणून प्रत्येक व्यक्तीने वाढदिवस ,वर्षश्राद्ध, तसेच विविध कार्यक्रम प्रसंगी समाजातील आधार नसलेल्या वर्गाला मदत होईल. म्हणून आश्रमातील व्यक्तींना साहित्य अथवा अन्नदान स्वरूपात  मदत करावी. असे आवाहन यावेळी गुरुप्रसाद देशपांडे यांनी केले.मोहन गायकवाड यांच्या  सामाजिक उपक्रमाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. ते समाजातील गोरगरीब नागरिक व  वंचितांच्या हितासाठी नेहमी अग्रेसर असतात. प्रेस क्लबच्या माध्यमातून शैक्षणिक, व सामाजिक, कार्य अश्या विविध ठिकाणी समाज सेवेच्या हेतूने ते नेहमीच काम करतात. तसेच आश्रमातील सध्यस्थिती बद्दल पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रम प्रसंगी पत्रकार शाम मापारी,मकरंद देशपांडे,रमेश शिंदे,सुहास पठाडे,शंकर नाबदे,गणेश दारकुंडे,कुणाल मांडण,सामजिक कार्यकर्ते इम्रानभाई दारूवाला,पोलिस पाटील राम शिंदे, दिलीप गायकवाड, तर गृहरक्षक दलाचे अशोक टेमकर, अल्ताफ शेख, अरुण देवढे, गफार शेख, उमेश इंगळे यांच्या सह मोठ्या संख्येने नागरिक  उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्रमाचे मार्गदर्शक पत्रकार सुधीर चव्हाण यांनी केले. तर आभार रावसाहेब मगर यांनी मानले.
प्रतिक्रियाः माणुसकीच्या नात्याने आपण देखील कुठंतरी समाजाचं  देणं लागतो. मी देखील सामान्य कुटूंबातील तरुण आहे. प्रेस क्लबच्या माध्यमातून गोरगरिब,गरजवतांना जितकी मदत करता येईल तितकी करतोच. आज वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून दिवभरतात समाजपयोगी उपक्रम केले. याचे मनस्वी समाधान  मला वाटते. -मोहन गायकवाड.प्रेस क्लब अध्यक्ष. नेवासा.

COMMENTS