Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोदी सरकारच्या विश्वकर्मा योजनेमुळे  वंचित कारागीर, बलुतेदारांचे व ओबीसी समाजातील छोट्या व्यवसाय करणाऱ्यांचे होणार  आर्थिक सशक्तिकरणं  – राजेंद्र मोरे  

नाशिक प्रतिनिधी - मोदी सरकारच्या विश्वकर्मा योजनेमुळे  वंचित कारागीर, बलुतेदारांचे व ओबीसी समाजातील छोट्या व्यवसाय करणाऱ्यांचे होणार  आर्थिक सशक्

साहेब चषक संभाजीनगरच्या यंग बॉईजने पटकावला
नेकनुर मध्ये राष्ट्रवादी ला खिंडार
बाल शक्ती व बाल कल्याण पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन

नाशिक प्रतिनिधी – मोदी सरकारच्या विश्वकर्मा योजनेमुळे  वंचित कारागीर, बलुतेदारांचे व ओबीसी समाजातील छोट्या व्यवसाय करणाऱ्यांचे होणार  आर्थिक सशक्तिकरणं होणार असून  त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल तर होणारच पण त्यातून देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होईल असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी प्रदेश ओ बी सी मोर्चा सचिव राजेंद्र मोरे यांनी केले आहे त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली या मोदी सरकारच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे.

प्रसिद्धी पत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की मोदी सरकारच्या विश्वकर्मा योजनेमुळे विकासापासून वंचित राहिलेल्या कारागिरांना, गावगाड्यातील बलुतेदारांना मोठा फायदा होणार आहे. ही योजना जाहीर करून मोदी सरकारने ‘ सबका साथ , सबका विकास , सबका विश्वास ” ही घोषणा प्रत्यक्षात आणली आहे,   भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव राजेंद्र मोरे यांनी केले आहे.

राजेंद्र मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘पंतप्रधान विश्वकर्मा योजना’ सुरू करण्याची घोषणा केली.  केंद्रीय मंत्रिमंडळाने १६ ऑगस्ट रोजी  १३ हजार कोटी खर्चाच्या या  योजनेला मंजुरी दिली.  समाजातील वंचित स्तरांमध्ये मजुरी आणि कारागिरी करणाऱ्या ३० लाख कारागिरांना  या योजनेचा लाभ मिळणार असून या योजनेत १८ व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे.  कारागिरांना व शिल्पकारांना विश्वकर्मा प्रमाणपत्र तसेच  ओळखपत्र  देण्यात येईल. साधनांच्या मदतीने काम करणारे  हस्त-कलाकार  आणि कारागिरांची गुरु-शिष्य परंपरा , त्यांच्या कुटुंबाची पारंपरिक कौशल्य जोपासणे आणि त्याला बळकटी देणे, हेही या योजनेचे उद्दिष्ट आहे. त्यातून देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत नक्कीच होईल असे ते म्हणाले.

या योजनेत  कारागिरांना , शिल्पकारांना प्रथम टप्प्यात एक लाख रूपये, द्वितीय टप्प्यात दोन लाख रूपये फक्त ५ टक्के व्याजदराने उपलब्ध करण्यात येणार आहेत . कारागिरांना त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने आवश्यक साहित्य, तांत्रिक, आधुनिक  कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रशिक्षण, डिजिटल व्यवहारासाठी तांत्रिक  साहाय्य या योजनेद्वारे केले जाणार आहे . सुतार, नाव बांधणारे कारागीर  ,  औजार  बनवणारे कारागीर  आदींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

या कारागिरांना मिळणार लाभ – १) सुतार २) होडी बांधणी कारागीर ३) चिलखत आदी अस्त्र  बनवणारे ४) लोहार ५) हातोडी आणि अवजार संच बनवणारे ६)कुलूप बनवणारे ७) सोनार ८) कुंभार ९) शिल्पकार (मूर्तिकार, दगडी कोरीव काम), पाथरवट (दगड फोडणारे) १०) चर्मकार (पादत्राणे कारागीर) ११) मेस्त्री १२) टोपल्या/चटया /झाडू/ कॉयर साहित्य कारागीर १३) बाहुल्या आणि खेळणी (पारंपरिक) बनवणारे १४) नाभिक  (केश कर्तनकार) १५) फुलांचे हार बनवणारे कलाकार  १६) परीट (धोबी) १७) शिंपी १८) मासेमारी साठीचे जाळे विणणारे. 

COMMENTS