नवी दिल्ली प्रतिनिधी - भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा शानदार कामगिरी केली आहे. हंगेरीची राजधानी बुडापोस्ट येथे सुरू असलेल
नवी दिल्ली प्रतिनिधी – भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा शानदार कामगिरी केली आहे. हंगेरीची राजधानी बुडापोस्ट येथे सुरू असलेल्या वर्ल्ड एथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ मध्ये आजचा दिवस भारतासाठी खास आहे. भारताला आजपर्यंत या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकता आले नाही. २००३ साली लांब उडीमध्ये अंजू बॉबी जॉर्जने कांस्य पदक जिंकले होते तर गेल्यावेळी नीरजने रौप्य पदक जिंकले होते. आता यावेळी नीरजचे लक्ष्य सुवर्ण पदकावर असून पात्रता फेरीत त्याने सुवर्ण पदकाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. पात्रता फेरीत नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८८.७७ मीटरचा थ्रो केला आणि अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. नीरजने दुसऱ्या प्रयत्नात ८१.३१ मीटर इतका लांब थ्रो केला. अंतिम फेरीसाठी ऑटोमेटिक क्वॉलिफिकेशन मार्क ८३ मीटर असल्याने नीरजने पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरी गाठली. पहिल्या प्रयत्नात ८८.७७ मीटर लांब भाला फेकून नीरज गुणतक्त्यात अव्वल स्थानी राहिला. या हंगामातील ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. वर्ल्ड एथलेटिक्स चॅम्पियशिपमध्ये तो सुवर्ण पदकाचा दावेदार मानला जात आहे. नीरजने फक्त अंतिम फेरीत धडक मारली नाही तर तो २०२४ मध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिपिकसाठी देखील पात्र ठरला आहे. भालाफेकमध्ये नीरजसोबत भारताचा डीपी मनु देखील आहे. त्याने पहिल्या प्रयत्नात ७८.१० मीटर इतका थ्रो केला. अद्याप मनुने अंतिम फेरीत स्थान मिळवले नाही. नीरज आणि मनुसह किशोर जेना देखील स्पर्धेत आहे.
COMMENTS