Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठी अभिनेते मिलिंद सफई यांचे निधन

मुंबई/प्रतिनिधी ः मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी शुक्रवारी प्रसिद्ध अभिनेते मिलिंद सफई यांच

नोरा फतेहीला पाहून ही मुलगी ढसाढसा रडू लागली
महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यासाठी अध्यादेश काढणार
सायबर गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी जनजागृती आवश्यक ः अ‍ॅड. शिंदे

मुंबई/प्रतिनिधी ः मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी शुक्रवारी प्रसिद्ध अभिनेते मिलिंद सफई यांचे (25 ऑगस्ट) निधन झाले आहे. अभिनेते मिलिंद सफई मागील काही काळापासून कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये प्रेमळ बाबांची आणि सासर्‍यांची भूमिका साकारली होती.
सध्या ‘आई कुठे काय करते’ या गाजत असलेल्या मालिकेत त्यांनी ‘अरुंधती’च्या बाबांची भूमिका केली होती. ‘त्यांच्या निधनामुळे आज मालिका पोरक्या झाल्या’ अशी भावना चाहत्यांमधून व्यक्त केली जात आहे. मराठी मनोरंजन विश्‍वातील ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित मिलिंद सफई यांच्या निधनाची बातमी चाहत्यांना सांगितली आहे. अभिनेते मिलिंद सफई यांचे निधन कॅन्सरने झाले असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. जयवंत वाडकर यांनी अभिनेत्याला सोशल मीडिया पोस्टमधून श्रद्धांजली वाहिली आहे. आता चाहते देखील या पोस्टवर कमेंट्स करून मालिका विश्‍वातल्या या प्रेमळ अन् लाडक्या ‘बाबा’ला श्रद्धांजली वाहत आहे. अभिनेते मिलिंद सफई यांना कर्करोगाचे निदान झाले होते. मागील काही काळापासून त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार देखील सुरू होते. मात्र, या उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांचा हा कॅन्सरशी लढा अपयशी ठरला.

COMMENTS