Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग’ प्रकरणात दिलासा

कोर्टाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारल्यामुळे प्रकरण बंद

पुणे/प्रतिनिधी ः राज्याच्या राजकारणात धुमाकूळ घालणारे फोन टॅपिंग प्रकरण आता पूर्णपणे बंद झाले आहे. सीबीआयने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयान

काँगे्रसमध्ये पुन्हा दुफळीचे संकेत
कोपरगाव विधानसभेची निवडणूक होणार रंगतदार
 ‘तू माझ्याशी बोलली नाही, तर मी मरतो’, आता करतोय पश्चाताप !

पुणे/प्रतिनिधी ः राज्याच्या राजकारणात धुमाकूळ घालणारे फोन टॅपिंग प्रकरण आता पूर्णपणे बंद झाले आहे. सीबीआयने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारला आहे. यामुळे आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाविकास आघाडीच्या वाटाघाटी सुरू असताना 2019 साली महाराष्ट्र गुप्तचर विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात आला होता. पण सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टला न्यायालयाने स्वीकारले. यामुळे या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला आहे.
राज्यात प्रचंड गाजलेल्या फोन टॅपिंग प्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना सशस्त्र सीमा दलच्या महासंचालकपदी पदोन्नती देण्यात आली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून यासंबंधी आदेश जारी करण्यात आला होता. भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना रश्मी शुक्ला यांच्यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप होता. राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त डॉ. रशी शुक्ला यांच्यावर अनेक गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. रश्मी शुक्ला या राज्य गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त पदावर कार्यरत होत्या. सध्या त्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैद्राबाद येथे कार्यरत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांमध्ये घोटाळ्याचा आरोप करत सभागृहात अहवालदेखील वाचून दाखवला होता. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्याकडूनच माहिती लीक झाल्याचे समोर आले होते. त्यांनंतर त्यांनी आपण महाराष्ट्र सरकारच्या परवानगीनेच फोन कॉल्स टॅप केल्याचे सांगत आपली बाजू मांडली.

COMMENTS