Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अपघातात तीन महिला भाविकांसह चौघांचा मृत्यू

सोलापूरजवळील घटना ; मृतांमध्ये पारनेर तालुक्यातील चौघांचा समावेश

अहमदनगर/प्रतिनिधी ः सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळजवळ महिला भाविकांच्या चार चाकी मोटारकारची मालमोटारीला धडक बसून घडलेल्या अपघातात कारचालकासह तीन

सोलापूर-धुळे हायवेवर धावत्या एसटीची मागची चाके निखळल्याने थरार
चंद्रपूर मध्ये एक भीषण अपघात.
मालवाहतूक वाहनाने धडक दिल्याने दोन दुचाकीस्वार जखमी.

अहमदनगर/प्रतिनिधी ः सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळजवळ महिला भाविकांच्या चार चाकी मोटारकारची मालमोटारीला धडक बसून घडलेल्या अपघातात कारचालकासह तीन महिलांचा मृत्यू झाला. तर अन्य सहाजण जखमी झाले. सर्व मृत व जखमी अहमदनगर जिल्ह्यातील रांजणगाव (ता. पारनेर) येथील राहणारे आहेत.
बुधवारी पहाटे सुमारास घडलेल्या या अपघातातील मृतांची नावे अशी-कारचालक आदमअली मुनवरआली शेख (वय 37), हिराबाई रामदास पवार (वय 75), कमलबाई मारूती वेताळ (वय 60) आणि द्वारकाबाई नागनाथ गायकवाड (वय 40). जखमींमध्ये बाळी बाबू पवार (वय 27), छकुली भुमा पवार (वय 27), साई योगीराज पवार (वय 7), सुरेखा भारत मोरे (वय 45) आणि बायजाबाई रामदास पवार (वय 60) यांचा समावेश आहे. रांजणगाव येथून पहाटे एका ईको मोटारीतून (एमएच 46-एपी 4120) तुळजापूरला तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी महिला भाविक निघाले होते. करमाळा-टेंभुर्णीचे अंतर पार करून मोटार सोलापूरच्या दिशेने येत असताना मोहोळजवळ मोटार एका मालमोटारीला पाठीमागून जोरात आदळली आणि हा मोठा जीवघेणा अपघात झाला. यात कारचालकासह दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एका महिलेचा सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असताना थोड्याच वेळात मृत्यू झाला. सहा जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

COMMENTS