Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जनता पँथरच्यावतीने महानगरपालिकेवर विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन

नांदेड प्रतिनिधी - महानगरपालिकेने नुकतेच नळपट्टी घरपट्टी मध्ये वाढ केली असून त्यामुळे सामान्य नागरिकांना घरपट्टी, नळपट्टी भरण्यासाठी अडचणी येत आह

महानगरपालिकेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेयांना अभिवादन
महानगरपालिके तर्फे शासकीय योजनांची जत्रा
प्रदूषण प्रकरणी कारवाईसाठी महापालिकेची विशेष पथके तैनात

नांदेड प्रतिनिधी – महानगरपालिकेने नुकतेच नळपट्टी घरपट्टी मध्ये वाढ केली असून त्यामुळे सामान्य नागरिकांना घरपट्टी, नळपट्टी भरण्यासाठी अडचणी येत आहेत.365 दिवसाची पानपट्टी या करूनतीन महिनेपाणीपुरवठा करण्यात येतो. ही जनतेची फसवणूक होते  . सर्वसामान्य नागरिकांसाठी पाणीपट्टी नळपट्टी त्वरित कमी करावी . व तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा भव्य पुतळा डंकीन परिसरात त्वरित उभारावा . वसरणी -लातूर फाटा येथील चौकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण पुतळा उभारावा. या मागणीसाठी जनता पँथरच्या वतीने एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.
शहरातील गोरगरीब सामान्य नागरिकांना महानगरपालिकेच्या वतीने कुठल्याच सुविधा नसल्या मुळे व महानगरपालिकेने नुकतीच घरपट्टी व नळपट्टी करा मध्ये वाढ केली आहे . दलित वस्त्यांमध्ये काही भागांमध्ये पक्के सीसी रस्ते नाहीत . ड्रेनेज नाही नाल्या नाहीत.  या समस्या महत्त्वाच्या असताना सुद्धा नुकतीच महानगरपालिकेने करा मध्ये वाढ करून सामान्य नागरिकांना वेटीस धरले आहे.  त्यामुळे  नागरिकांना घरपट्टी ,नळपट्टी मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे हातावर पोट असल्याने ते भरू शकत नाहीत . त्यामुळे ती घरपट्टी नळपट्टी त्वरित कमी करावी.  महानगरपालिकेच्या वतीने विविध वार्डामध्ये सोयी सुविधा पुरवाव्या व तथागत भगवान गौतम बुद्ध व परमपूज्य डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळा उभारावा यांच्यासह विविध मागण्यासाठी जनता पँथरच्या वतीने महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले . यावेळी जनता पँथरची आकाश चव्हाण ,राज चव्हाण यांची उपस्थिती होती.

COMMENTS