Homeताज्या बातम्यादेश

तामिळनाडूतील कलाकाराने बनवले सोन्याचे चांद्रयान

चेन्नई ः इस्रोच्या या चांद्रयान मोहिमेकडे जगाचे लक्ष लागल असतांना तामिळनाडूतील एक कलाकार चर्चेत आला आहे. आपल्या कौशल्याने या कलाकाराने 4 ग्रॅम सो

मावळ लोकसभेसाठी फेर मतदान व्हावे : श्रीरंग बारणे यांची मागणी
संत निळोबाराय विद्यालयात ’शिक्षण सप्ताह’ सुरू
पर्यटकांनी फुलले पाचगणी, महाबळेश्‍वर

चेन्नई ः इस्रोच्या या चांद्रयान मोहिमेकडे जगाचे लक्ष लागल असतांना तामिळनाडूतील एक कलाकार चर्चेत आला आहे. आपल्या कौशल्याने या कलाकाराने 4 ग्रॅम सोन्याने चांद्रयान-3 चे मॉडेल तयार केले आहे. तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील एका कलाकाराने 4 ग्रॅम सोन्याचा वापर करून चांद्रयान 3 चे मॉडेल तयार केले आहे. त्याची लांबी 1.5 इंच आहे. अवघ्या 48 तासांत त्याची निर्मिती केली आहे. कलाकार मरियप्पन यांनी सांगितलं की, जेव्हा काही महत्त्वाची घटना घडते, तेव्हा मी सोन्याचा वापर करून त्याचे छोटे मॉडेल बनवतो. प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. या सोन्याच्या चांद्रयानाच्या मॉडेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

COMMENTS