Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 कर्मवीर काळे कारखान्याच्या उपाध्यक्षपदी डॉ.मच्छिंद्र बर्डे

कोपरगांव/प्रतिनिधी ः सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणार्‍या व कोपरगाव तालुका तसेच पंचक्रोशीतील शेतकरी, छोटेमोठे व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांच्या अ

महापालिकेच्या वतीने पाईपलाईन रोड येथील चौकाचे कै.शंकरभाऊ वाणी नामकरण
दृष्काळसदृष्य परिस्थितीचे सावट जाऊन भरपूर पाऊस होऊ दे.
मतदान न करणार्‍या शिक्षक मतदारांवर कारवाई होणार का ?

कोपरगांव/प्रतिनिधी ः सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणार्‍या व कोपरगाव तालुका तसेच पंचक्रोशीतील शेतकरी, छोटेमोठे व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांच्या अर्थकारणाला चालना देणार्‍या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी कारखान्याचे संचालक डॉ.मच्छिंद्र रंगनाथ बर्डे यांची संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल कारखान्याचे जेष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आ. अशोकराव काळे व कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदी डॉ.मच्छिंद्र बर्डे यांची संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली. यावेळी आपल्या निवडीबद्दल बोलतांना नवनिर्वाचित उपाध्यक्ष डॉ.मच्छिंद्र बर्डे म्हणाले की, कर्मवीर शंकररावजी काळे साहेब व माजी आ. अशोकराव काळे यांनी नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर कुटुंबातील सदस्याप्रमाणे प्रेम करून त्यांच्यासोबत काम करण्याची संधी दिली आहे. ही परंपरा कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे पुढे चालवत आहे. माजी आ. अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी सांभाळत असतांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रमण करून आ.आशुतोष काळे यांनी कारखाना प्रगतीपथावर ठेवला. हे सर्व संचालकासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे.  कारखान्याच्या उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल नवनिर्वाचित उपाध्यक्ष डॉ.मच्छिंद्र बर्डे यांनी माजी आ.अशोकराव काळे, आ.आशुतोष काळे व सर्व संचालक मंडळाचे आभार मानले. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, प्र.कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद, डेप्युटी सेक्रेटरी संतोष शिरसाठ व पदाधिकारी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रादेशिक उपसंचालक (साखर) अहमदनगर डॉ.प्रविण लोखंडे यांनी काम पाहिले.

COMMENTS