Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोखंडी रॉडने मारहाण,कोपरगावात नऊ जणांवर गुन्हा दाखल

कोपरगाव/प्रतिनिधी ः तालुक्यातील रवंदे येथील रहिवासी असलेल्या फिर्यादीस आरोपी मंगल संतु मोरे,किशोर संतु मोरे,सिद्धार्थ सुनील निकम आदिसंह नऊ जणांनी

घटस्फोटीत महिलेचा पतीकडून विनयभंग
महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा
खासगी रुग्णालयांनी ऑडिटर तपासणीची बंधने झुगारली

कोपरगाव/प्रतिनिधी ः तालुक्यातील रवंदे येथील रहिवासी असलेल्या फिर्यादीस आरोपी मंगल संतु मोरे,किशोर संतु मोरे,सिद्धार्थ सुनील निकम आदिसंह नऊ जणांनी बेकायदा जमाव जमवून तेथील बसस्थानकाजवळ सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास,लोखंडी रॉड,हॉकी स्टिक,लाकडी स्टंप,आदींच्या सहाय्याने संपवून टाकतो म्हणून बेदम मारहाण केली असल्याचा गुन्हा फिर्यादी तरुण मजूर सुरेश भाऊसाहेब मोरे याने कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात दाखल केला आहे. त्यामुळे रवंदेसह तालुक्यात  मोठी खळबळ उडाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार,फिर्यादी सुरेश मोरे व आरोपी मंगल मोरे हे रावंदे येथील रहीवासी आहेत. त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद आहेत. दि.18 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास फिर्यादी हा रवंदे येथील बसस्थानकाजवळ उभा असताना आरोपी मंगल मोरे व त्यांचे सहकारी किशोर संतु मोरे,सिद्धार्थ सुनील निकम,देवा बाळू मोरे,रवींद्र सुनील निकम,दिपक बाळू साळवे,विजय अरुण मोरे, (रा.रवंदे,)बिपीन रमेश बनसोडे,शुभम शिंदे (रा.अंदरसुल ता.येवला)आदींनी गैरकायद्याची मंडळी जमवून हातात लोखंडी रॉड,हॉकी स्टिक,लाकडी स्टंप,आदींच्या सहाय्याने फिर्यादि सुरेश मोरे यास संपवून टाकतो असे म्हणून बेदम मारहाण केली.असा गुन्हा फिर्यादी तरुण मजूर सुरेश भाऊसाहेब मोरे (वय-24) याने कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात दाखल केला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस सहाय्यक निरीक्षक सुरेश आव्हाड,पोलीस हे.कॉ.संदीप बोटे आदींनी भेट दिली आहे. यातील तीन आरोपीना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती तपासी अधिकारी यांनी दिली आहे. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा नोंदणी पुस्तक क्रं.415/2023 भा.द.वि.कलम 326,323,504,143,147,148,149 प्रमाणे नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.बोटे हे करीत आहेत.

COMMENTS