Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तलाठी व मंडळ अधिकारी यांचा अजब कारभार

25 शेतकर्‍यांच्या 94 गुंठे गायब

पाटोदा प्रतिनिधी - तालुक्यातील कारेगाव येथून अहमदनगर - परळी रेल्वे मार्ग  आणि पैठण ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने या गावातील जमीनीचे

महाराष्ट्र केसरी पै. बाला रफीक शेख याने मारले पणुंब्रेचे मैदान
इमारतीची लिफ्ट कोसळून एक जण ठार, तर तीन जण जखमी | LOKNews24
शिरूरमधून आमचाच उमेदवार निवडून आणू

पाटोदा प्रतिनिधी – तालुक्यातील कारेगाव येथून अहमदनगर – परळी रेल्वे मार्ग  आणि पैठण ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने या गावातील जमीनीचे भाव गगनाला भिडले आहेत.या गावातील नागरिक डोंगराल भाग असल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी  मुंबई – पुणेसह  देश विदेशात गेलेला आहे.सध्या या कारेगावच्या एका बाजूला अहमदनगर- परळी, रेल्वे मार्ग तर दुसर्‍या बाजूला पैठण – पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग गेल्याने ग्रामस्थ पुन्हा गावाकडे धाव घेत असून आपल्या जमीनीचे सातबारा काडुन मावेजा मिळावा म्हणून प्रयत्न करत आहे.यामध्ये ज्या नागरिकांना कमी जमीन कमी आहे ते नागरिक तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना हाताशी धरून अमाप पैसा देऊन  विना खरेदी आपला सातबारा वाढवून शासनाची व नागरिकांची फसवणूक करत असल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.25 शेतकर्‍यांच्या 94 गुंठे क्षेत्र कमी करून दुसर्‍याच व्यक्ती नावे केल्याने तलाठी आणि मंडळ अधिकार्‍याचा अजब कारभार उघड झाला आहे. जेव्हा प्रकरण येथील शेतकर्‍यांच्या निर्दशनास आले तेव्हा येथील नागरिकांनी पाटोदा तहसीलदार निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली.त्यावेळी तहसीलदार बालाजी चितळे यांनी याबाबतीत सविस्तर चौकशी करून संबंधित प्रकरणात जर कोणी दोषी आढळून आला त्याची गय केली जाणार नाही असे आश्वासन संबंधित शेतकर्‍यांना दिला असुन नेमकी या प्रकारणात काय कारवाई होते याकडे सर्व गावकर्‍यांचे लक्ष लागले आहे..

COMMENTS