Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ.के.पी.उबाळे यांच्या पुण्यस्मरण निमित्त अभिवादन

श्रीगोंदा प्रतिनिधी ः तालुक्यातील एक निष्णात डॉक्टर के.पी.उबाळे हे शिरसगावचे भूषण अनेकांचे प्रेरणास्थान, आधारस्तंभ, मार्गदर्शक आणि एक संघर्षमय प

वळणला गावठी कट्टा तर गंगापुरला तलवार बाळगणार्‍या दोघांना अटक
Sushant Singh Rajput Case मध्ये रिया चक्रवर्तीच्या अडचणी वाढणार | ‘Filmi Masala’ | LokNews24
एकलहरे शिवारात धाडसी दरोडा ; एकाचा खून

श्रीगोंदा प्रतिनिधी ः तालुक्यातील एक निष्णात डॉक्टर के.पी.उबाळे हे शिरसगावचे भूषण अनेकांचे प्रेरणास्थान, आधारस्तंभ, मार्गदर्शक आणि एक संघर्षमय प्रवास अखेर थांबला. तो गतवर्षी 12 ऑगस्ट 2022 रोजी त्यांचे ठाणे या ठिकाणी निधन झाले. त्यांच्या कुटुंबाने सामाजिक बांधिलकी जपत त्यांचे प्रथम पुण्यस्मरण शिरसगाव या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांना अभिवादन केले. 12 ऑगस्ट 2023 रोजी अभिवादन सभा घेण्यात आली.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अनुराधा नागवडे, माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार,माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडलिकराव दरेकर,डिकसळचे सरपंच अ‍ॅड.महेंद्र शिंदे,वसंतराव नितनवरे, दत्तात्रय सोनवणे,अनिल नेटवटे यांच्या सहित शिरसगावचे सरपंच, उपसरपंच, चेअरमन ,व्हा. चेअरमन सर्व ग्रामस्थ व उबाळे परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. दुसर्‍या दिवशी (13ऑगस्ट)इंपल्स हॉस्पिटल अहमदनगर येथे उबाळे परिवार आणि शिरसगाव ग्रामस्थ यांच्या वतीने भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. आलेल्या सर्व रुग्णांना जेवणाची व्यवस्था उबाळे कुटुंबाने केली. सर्व रुग्णांची तपासणी इंम्पल्स हॉस्पिटलचे संचालक हृदयरोग तज्ञ डॉ.संदीप गाडे,अस्थिरोग तज्ञ डॉ.प्रशांत तांदळे, नेत्ररोगतज्ञ डॉ.विजय गाडे,डॉ.संदिप अनभुले, डॉ.उबाळे यांची कन्या डॉ.तेजस्विनी उबाळे यांनी केली. गावातील ग्रामस्थ व परिसरातील रुग्णांनी याचा लाभ घेतला. या कार्यक्रमाला गावातील सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हा.चेअरमन, सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डिकसळचे सरपंच ऍड. महेंद्र शिंदे यांनी केले.तर सूत्रसंचालन संतोष उबाळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल नेटवटे, अ‍ॅड.महेंद्र शिंदे, डॉ. तेजस्विनी पवार, मंगल पवार ,संध्या उबाळे,विक्रांत उबाळे,सुनील उबाळे,संतोष शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

COMMENTS