कोपरगाव प्रतिनिधीः कोणताही शेतकरी पीकविमा योजनेपासून वंचित राहू नये. म्हणून राज्य सरकारने शेतकर्यांना ई-पीक पाहणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
कोपरगाव प्रतिनिधीः कोणताही शेतकरी पीकविमा योजनेपासून वंचित राहू नये. म्हणून राज्य सरकारने शेतकर्यांना ई-पीक पाहणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकर्यांनी येत्या 25 ऑगस्टपर्यंत ई-पीक पाहणी करून घ्यावी. असे आवाहन कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजपच्या नेत्या स्नेहलता कोल्हे यांनी केले आहे.
या पार्श्वभूमीवर 17 ऑगस्ट 2023 रोजी काकडी येथील शिर्डी विमानतळ परिसरात झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाव्य संकट लक्षात घेऊन शेतकर्यांना आश्वस्त केले आहे. शेतकर्यांवर संकट ओढवले तर सरकार शेतकर्यांना वार्यावर सोडणार नाही. अडचणीच्या काळात सरकार शेतकर्यांना योग्य ती आर्थिक मदत करेल व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे शेतकर्यांनी अजिबात घाबरू नये, अशा शब्दांत स्नेहलता कोल्हे यांनी शेतकर्यांना धीर दिला आहे.
यंदाच्या खरीप हंगामात कोपरगाव विधानसभा मतदारसंघात कोपरगाव तालुक्यातील जवळपास 33 हजार 488 तर मतदारसंघात येणार्या राहाता तालुक्यातील पुणतांबा मंडळातील 11 हजार 574 शेतकर्यांनी बाजरी, मका, सोयाबीन, कापूस, तूर, भुईमुग, कांदा आदी पिकांची पेरणी केलेली आहे. मतदारसंघातील सुमारे 45 हजार शेतकर्यांनी पीकविम्याचे अर्ज भरले आहेत. दुष्काळ, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होऊन शेतकर्यांच्या उत्पनात घट आल्यास सरकारच्या धोरणाप्रमाणे शेतकर्यांना आगाऊ नुकसान भरपाई देण्यात येते. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील पावसाची परिस्थिती ध्यानात घेऊन शेतकर्यांनाही शासनाच्या धोरणानुसार पीकविम्यापोटी आगाऊ नुकसान भरपाई देण्याची तसेच यासाठी शेतकर्यांच्या नुकसानीचे महसूल व कृषी विभागामार्फत त्वरित पंचनामे करण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्याची मागणी आपण मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे केली असल्याचे स्नेहलता कोल्हे यांनी सांगितले.
माजी आ.स्नेहलता कोल्हे – दोन-अडीच महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची व शेतकर्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्यांनी शासनाने केलेल्या आवाहनानुसार एक रुपयात पीकविमा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-पीक पाहणी करून घ्यावी. ई-पीक पाहणी करून घेण्याची मुदत 30 ऑगस्ट 2023 पर्यंत असली तरी पुढे काही अडचणी येऊ नये, त्रुटी राहू नये म्हणून तातडीने 25 ऑगस्टपर्यंत ई-पीक पाहणी करून घ्यावी.
COMMENTS