Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘ग्रामपंचायत आपल्या दारी’ हा उपक्रम राबवा

युवा नेते विवेक कोल्हे यांनी मांडली अभिनव संकल्पना

कोपरगाव प्रतिनिधी ः शासनाच्या विविध योजनांचा गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान

दिवाळी निमित्त वृद्धाश्रमात आरोग्य तपासणीद्वारे मोफत औषधांचे वाटप
BREAKING: खा. सुजय विखे पाटील यांच्याविरोधात औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल | पहा Lok News24
चिमुकल्यांच्या वारीसाठी आ. थोरातांचा ताफा थांबतो तेव्हा.

कोपरगाव प्रतिनिधी ः शासनाच्या विविध योजनांचा गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यभरात ‘शासन आपल्या दारी’ अभियान राबविण्यात येत आहे. ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या धर्तीवर ‘ग्रामपंचायत आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्याची अभिनव संकल्पना सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, युवा नेते विवेक कोल्हे यांनी मांडली आहे.

कोपरगाव तालुक्यात ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या धर्तीवर ‘ग्रामपंचायत आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात यावा. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांनी ग्रामस्थांच्या थेट घरापर्यंत जाऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घ्याव्यर्चीं. त्या समस्या सोडविण्यावर भर असू द्यावा. असे आवाहन युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले आहे. विवेक कोल्हे पुढे म्हणाले, केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महायुतीच्या सरकारने सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून जनतेच्या हितासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा गरजूंना लाभ मिळवून देण्यासाठी तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभरात ‘शासन आपल्या दारी’ अभियान राबविण्यात येत आहे. अहमदनगर जिल्हास्तरावरील ‘शासन आपल्या दारी’ अभियान नुकतेच कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे पार पडले. ‘शासन आपल्या दारी’ अभियानास नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. शासनाच्या वतीने गावच्या विकासासाठी विविध योजनांतर्गत ग्रामपंचायतला थेट निधी दिला जातो. गावातील अनेक लोकांना शासनाच्या योजनांची माहिती नसते. माहिती अभावी या योजनांचा लाभ गरजू लोकांना मिळत नाही. शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या व गाव विकासाच्या विविध योजना गावकर्‍यांपर्यंत पोहोचवून गरजूंना त्याचा लाभ देण्यासाठी तसेच ग्रामस्थांच्या समस्या व अडीअडचणी जाणून घेण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या धर्तीवर कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींनी ‘ग्रामपंचायत आपल्या दारी’ हा उपक्रम राबविल्यास ग्रामस्थांना त्याचा फायदा होईल.

गावकर्‍यांना पाणी, रस्ते, पथदिवे, स्वच्छता, सांडपाणी व कचरा व्यवस्थापन आदी प्रश्‍न सोडविण्यासाठी तसेच रहिवासी,जन्म-मृत्यू नोंद व इतर विविध प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी व अन्य कामांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात हेलपाटे घालावे लागतात. विविध प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा करावा लागतो. जर ‘ग्रामपंचायत आपल्या दारी’ उपक्रमाच्या माध्यमातून सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक,तलाठी व ग्रामपंचायतचे कर्मचारी यांनी प्रत्यक्ष गावकर्‍यांपर्यंत जाऊन त्यांचे प्रश्‍न व समस्या जाणून घेऊन लगेचच मार्गी लावल्या.तर गावकर्‍यांचे श्रम, पैसा आणि वेळेची बचत होईल. गावकर्‍यांचे प्रश्‍न त्वरित सुटले. तर त्यांना मोठा दिलासा मिळू शकेल.

COMMENTS