मुंबई/प्रतिनिधी ः नुकतेच एका व्यक्तीने आपले बोट तोडून घेतले आहे. पोलिस प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे त्याने भाजपला मत दिलेले बोट कापले आहे. यावरू
मुंबई/प्रतिनिधी ः नुकतेच एका व्यक्तीने आपले बोट तोडून घेतले आहे. पोलिस प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे त्याने भाजपला मत दिलेले बोट कापले आहे. यावरून संताप उमटत असतांना, काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधत एकही भूल कमल का फुल अशी प्रतिक्रिया लोकांमधून उमटली होती. आता तर ज्या बोटाने भाजपाला मतदान केले ते बोटच कापून टाकण्याचा प्रकार घडला आहे. ही मन सुन्न करणारी घटना असून, भाजपला याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा पटोले यांनी दिला आहे.
भाजपाला मतदान करून आपणच आपल्या पायावर कुर्हाड मारून घेतली अशी लोकांची भावना आहे. जनतेला खोटी स्वप्ने दाखवून 2014 साली सत्तेवर आलेल्या भाजपाचा खरा चेहरा जनतेला उमगला असून आपली फसवणूक झाल्याने जनतेला पश्चाताप होऊ लागला आहे. नाना पटोले म्हणाले की, भय आणि भ्रष्टाचार हेच भारतीय जनता पक्षाचे चाल व चलन आहे. केंद्रातील भाजप सरकारप्रमाणेच महाराष्ट्रातील भाजपाप्रणित सरकारही जनतेला नकोसे झाले आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार, खासदार खुलेआम दादागिरी करत आहे. मुंबईतील शिंदे गटाच्या आमदार पुत्राने एका अधिकार्याचे अपहरण करून त्यांना मारहाण केली, दुसर्या आमदाराने गोळीबार केला, एक आमदार महाशय अधिकार्यांचे डोळे काढण्यापर्यंतची भाषा करत आहे. केंद्रातील मंत्री तर औकात दाखवण्याची भाषा करत असल्याचे नाना पटोले यांनी यावेळी सांगितले.
COMMENTS