Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’शासन आपल्या दारी’ विद्यार्थी करतात ’शाळेची पायी वारी’

आमदार तनपुरे यांनी आपल्या वाहनातून विद्यार्थिनींना नेण्याची केली व्यवस्था

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी नगर जिल्ह्यातील एसटी बसेस राखीव केल्याने शासन लोकांच्या दारी येत असेले तरी ग्रामीण

आ. तनपुरे यांच्या प्रयत्नातून 21 नवीन रोहित्रे बसविणार
शेतकरी हिताच्या योजनांना आडकाठी
महागाई रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ः आ. तनपुरे

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी नगर जिल्ह्यातील एसटी बसेस राखीव केल्याने शासन लोकांच्या दारी येत असेले तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मात्र पायपिट करावी लागली. राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी रोष व्यक्त करत तालुक्यातील वांबोरी परिसरातील विद्यार्थिनींना त्यांच्या शाळेत जाण्यासाठी आपले वाहन उपलब्ध करून स्वतः रस्त्यावर वाहनाची वाट पाहत थांबले.


                 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिर्डी येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी राहुरीसह जिल्ह्याच्या अनेक भागातून बसेस ही व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे ग्रामीण भागातील बससेवेच्या फेर्‍या रद्द झाल्याने बससेवा कोलमडून गेली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी असणार्‍या अनेक बसेस या कार्यक्रमासाठी राखीव असल्याने आज महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसेस उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना विद्यालयात जाण्यासाठी पायपिट करावी लागली. राहुरीचे आ.प्राजक्त तनपुरे हे वांबोरी भागात जात असताना अनेक ठिकाणी विद्यार्थी उभे दिसले तर काही ठिकाणी विद्यालयाच्या दिशेने पायपिट करीत विद्यार्थी चालले होते. आ.तनपुरे यांनी स्वतःचे वाहन थांबवून विद्यार्थ्यांची आपुलकीने चौकशी केली. तर त्यावेळी आज बसच येईना, कोणतेही साधन मिळेना त्यातच शाळेला उशीर होवू लागल्याने आम्ही सर्व शाळेत पायी चाललो आहे, असे आ.तनपुरे यांना सांगितले. आ.तनपुरे यांनी स्वतः रस्त्यावर थांबुन या विद्यार्थ्यांना शाळेत सोडून येण्याचे चालकास सांगितले. आमदार तनपुरे रस्त्यावर थांबत विद्यार्थींनीची शाळेत जाण्यासाठी स्वतः च्या गाडीतून सोय केली. शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी गर्दी करण्यासाठी जिल्ह्यातील एसटी सेवा कोलमडून टाकली आहे. यावेळी आ.तनपुरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी रोज येणारी आमची बस गुरुवारी शिर्डीच्या कार्यक्रमाला गेल्याने आम्हाला पर्यायी वाहनाने किंवा पायी जावे लागणार असल्याचे सांगितले. यावेळी तनपुरे यांनी रोष व्यक्त करत शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे बाबतीत नाराजी व्यक्त केली. शासन लोकांच्या दारी आणले परंतू शालेय विद्यार्थ्यांना मात्र रस्त्यावरुन पायपिट करायला लावली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यक्रमास गर्दी करण्यासाठी मोफत बससेवा उपलब्ध करुन दिली. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक ठिकाणच्या विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागल्याचे तनपुरे यांनी सांगितले.

COMMENTS