Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर सुजीत पाटकरला पोलिसांनी केली अटक

मुंबई ः ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना मुंबई पोलिसांनी गुरुवारी अटक केली. पाटकर यांना मुंबईचे कोविड सें

मनपाची 36 वाहने भंगारात; नवीन कार खरेदीचा प्रस्ताव प्रलंबित
चांद्रयान-3 आज चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार
सख्ख्या बापानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार l LokNews24

मुंबई ः ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना मुंबई पोलिसांनी गुरुवारी अटक केली. पाटकर यांना मुंबईचे कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 36 कोटींचा कोविड सेंटर घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबईच्या आझाद मैदान पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ईडीने यापूर्वी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पाटकर यांना अटक केली होती.  कोविड काळात सुजीत पाटकर आणि तीन भागीदारांना कोविड जंबो सेंटरचे व्यवस्थापन चालवण्याचे कंत्राट मिळाले होते. मात्र हे कंत्राट मिळवण्यासाठी पाटकर आणि सहकार्‍यांनी वरळी आणि दहिसर येथील जम्बो कोविड सेंटरकडून बोगस कागदपत्रे दाखल करण्यात आली, असा आरोप ईडीच्या वतीने पाटकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सुजीत पाटकर हे ठाकरें गटाचे खासदार संजय राऊत निकटवर्तीय आहेत. पाटकर हे पेशाने व्यावसायीक आहेत. लाइफसायन्सेस हॉस्पिटल अँड मॅनेजमेंट या फर्ममध्ये पाटकर एक भागीदार होते. सुजीत पाटकर हे संजय राऊत यांचे फ्रंटमॅन असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. 

COMMENTS