येवला-: येथील श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या स्वामी मुक्तानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक तथा विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात भार
येवला-: येथील श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या स्वामी मुक्तानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक तथा विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी विज्ञान महाविद्यालय प्राचार्य डॉ धनराज गोस्वामी यांचे शुभहस्ते ध्वजारोहण झाले.राष्ट्रगीत होताच राज्यगीत गायनही झाले.
संस्थेच्या सुवर्ण महोत्सव सांगतेमुळे संस्थेच्या स्थापनेतील दिवंगत संस्थाचालक यांच्या प्रतिमांचा चित्ररथ गावातून सवाद्य सघोष संचलनात शोभून दिसत होता. मिरवणुकीत पाचवी ते दहावीचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. शहरातील सर्व राष्ट्रपुरुषांचे पुतळ्यांना पुष्पमाला अर्पण करून सलामी देण्यात आली.अकरा भारतीय वृक्षांचे वृक्षारोपण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ए मेरे वतन….हे देशभक्तीपर गीत यावेळी सादर करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध थोर नेत्यांच्या वेशभूषा साकारत कार्यक्रमाची शोभा वाढवली.शाळेचे माजी व पाकिस्तान बाॅर्डरवर नियुक्ती असलेले सैनिक अधिकारी विद्यार्थी विकास गायकवाड यांची उपस्थिती विशेष लक्षणीय ठरली.सोहळ्यात अध्यक्ष डॉ अमृतसा पहिलवान, सेक्रेटरी संजय नागडेकर, खजिनदार सुधांशु खानापुरे, संचालिका शकुंतला पहिलवान, सभासद शशीकला फणसे, दत्तात्रय नागडेकर, डाॅ किरण पहिलवान, डाॅ अमोल पहिलवान, तेजस गायकवाड, अमोल एंडाईत तसेच सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते. यावेळी प्राचार्य सतीश पैठणकर यांनी प्रास्ताविक केले तर उत्सवप्रमुख पं डाॅ श्री प्रसादशास्त्री कुळकर्णी सर यांनी सूत्रसंचालन तर आभार पर्यवेक्षक ज्ञानेश्वर भागवत यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर वृंदांनी परिश्रम घेतले.यावेळी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS