Homeताज्या बातम्यादेश

चांद्रयान-3′ अखेरच्या टप्प्यात

इस्त्रोने ट्विट करत दिली माहिती

श्रीहरीकोटा प्रतिनिधी - चांद्रयान 3चा चंद्राच्या शेवटच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश झाला आहे. चांद्रयान - ३ चा चंद्राच्या शेवटच्या गोलाकार ऑर

स्वस्तात खरेदी करा नोकियाचा ‘हा’ नवा फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
पारदर्शक निवडणुका होण्यासाठी दक्षता घ्या : डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत विधी सेवा जागरुकता शिबीर

श्रीहरीकोटा प्रतिनिधी – चांद्रयान 3चा चंद्राच्या शेवटच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश झाला आहे. चांद्रयान – ३ चा चंद्राच्या शेवटच्या गोलाकार ऑर्बिटमधे यशस्वी प्रवेश झाला आहे. इस्रोने ट्विट करून ही माहिती दिली. भारताची चांद्रयान मोहिम अखेरच्या टप्प्यात आहे. आज सकाळी साडे आठ वाजता चांद्रयानने आणखी एक मोठा टप्पा पूर्ण केला आहे. चांद्रयानच्या चंद्रा भोवतीच्या क्रिया पूर्ण झाल्या असून लवकरच प्रॉपल्शन आणि लँडर एकमेकांपासून वेगळे होणार आहेत. इस्त्रोने ट्विट करत माहिती दिली की ‘सध्या चांद्रयान हे चंद्राभोवती 153×163 एवढ्या कक्षेत फिरत आहे. पुढिल टप्प्यामध्ये उद्या 17 ऑगस्टला प्रॉपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल एकमेकांपासून वेगळे होणार आहेत.’ पण याची अद्याप कोणतेही माहिती दिली नाही. चांद्रयानमध्ये असलेल्या लँडरमध्ये रोव्हर फिट करण्यात आले आहे. या दोन्हीला मिळून लँडर मॉड्यूल बोलले जाते. आता प्रॉपक्शन मॉड्यूल हे लँडर मॉड्यूलला चंद्रापासून 100 किलोमीटर उंचीवरील कक्षेत नेणार आहे. यानंतर हे दोन्ही एकमेकांपासून वेगळे होणार आहे. लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावर जाण्यासाठी प्रवास करेल. 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान 3 हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल. तसेच ही मोहीम पुर्ण झाल्यास भारत हा चंद्रावर उतरणारा चौथा देश म्हणून ओळखला जाणार आहे.

COMMENTS