Homeताज्या बातम्यादेश

शिमलामध्ये भूस्खलन, ढिगाऱ्याखाली ३० ते ३५ जण अडकल्याची भीती

हिमाचल प्रदेश प्रतिनिधी - हिमाचल प्रदेशच्या शिमलामध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून येथील एका शिव मंदिराजवळ मोठं भूस्खलन झाल्याची माहिती आहे. या

ठाकरेंविरोधात महायुतीचे आज शक्तीप्रदर्शन
शाहू महाराज छत्रपती लढणार लोकसभा ?
पुण्यात बनावट दारूच्या कारखान्याचा पर्दाफाश

हिमाचल प्रदेश प्रतिनिधी – हिमाचल प्रदेशच्या शिमलामध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून येथील एका शिव मंदिराजवळ मोठं भूस्खलन झाल्याची माहिती आहे. या भूस्खलनात ३० ते ३२ लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली फसल्याचे सांगण्यात येते. शिमल्यातील समरहिलजवळ ही घटना घडल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ७ वाजता ही घटना घडली. सकाळी-सकाळी मंदिरात पूजा करण्यासाठी लोक पोहोचले होते. यावेळी, लँडस्लाईड होऊन दुर्घटना घडली. येथे सातत्याने भूस्खलन होत असते, त्यात पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. त्यामुळे, मदत व बचावकार्यात अडथळे येत आहेत.

COMMENTS