खरोखर ! एके काळी भारतीय संस्कृती लोप पावल्याचे चित्र दिसत होते परंतु आता डिजिटल का होईना पण भारतीय संस्कृती पुन्हा डिजिटल स्वरूपात येऊन ठेपली आहे
खरोखर ! एके काळी भारतीय संस्कृती लोप पावल्याचे चित्र दिसत होते परंतु आता डिजिटल का होईना पण भारतीय संस्कृती पुन्हा डिजिटल स्वरूपात येऊन ठेपली आहेत. जस जसी मोबाईल ची उत्क्रांती होत गेली तसे विविध प्रकारच्या फॅसिलिटीज मोबाईल कंपनी आपल्या ग्राहकांना देत आहेत.त्यामुळे कमी वेळात तयार होऊन आपल्या लाडक्या स्टुडिओत येऊन ठेपतो. किंबहुना विधाऊट स्टुडिओचे देखील फोटो, व्हिडीओ शुटींग करता येतात त्यामुळे यंदाचा धोंड्याच्या महिन्यात सासू सासऱ्यासह लेक जावई अगदी दिमाखात भारतीय संस्कृती जपत असल्याचे मोहक चित्र दिसले. अगदी हिरवळ मनमोहक वाटते तसे काही.!
विविध प्रांतात तसा अधिक मास आगळा वेगळा साजरा केला जात असला तरी त्यात प्रेम ही भावना अधिक असते. त्यामुळे जावई बापूंची चांगलीच मेजवानी असते। अतिशय चोखंदळ खाद्य संस्कृती आपली असल्याने जावई येणार म्हणून तर्हे तर्हेचे जेवण बनवले जाते. दर तीन वर्षानी येणारे हे इंग्रजी कॅलेंडर पद्धतीने लीप वर्ष असते आणि भारतीय संस्कृती प्रमाणे अधिक मास दोघांचा अर्थ तसा एकच होतो प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं आमचं सेम असतं . फेसबुक , इंस्टाग्राम , युट्यूब , विविध सोसिअल मीडियावर दनकावून आपल्याच भारतीय संस्कृतीचा बोल बाला दिसत आहेत. लेकी साठी शालू, पैठणी , नऊ वार , परिस्थिती प्रमाणे साडी ई.तसेच लाडक्या जावयाचे कौतुक तर विचारूच नये अंगठी , कपडे , चैन थाटा- माटात केलेले औक्षण ! या साऱ्या परिस्थितीत आपल्या कुवतीनुसार आपली संस्कृती जतन करण्याचे काम भारतीय कुटुंब व्यवस्था करत आहेत.
शिक्षण घेऊन संस्कार न जपणाऱ्या महाशयांना चपराक -हीच ती भारतीय संस्कृती आहेत जी लपली जात नाहीत. माया , ममता , जिव्हाळा इथेच आणि इथेच मिळतो असे ठणकावून सांगणारी भारतीय संस्कृती की ज्याचा आधारे आपणास आज विविधरंगी मेजवानी मिळते. शिक्षणाचा आधार घेऊन जीवन हे संस्कृतीवर सोपवून जीवन जगताना त्यांच्या जगण्याला भारतीय व्यवस्थेत संस्कृती डुंबवू देत नाहीत.
सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण दिले आणि त्याबरोबर संस्काराची शिदोरी देखील सोबत दिल्याची भावना अनेक महिला बोलवून दाखवतात. त्यामुळे घमंडी लोकांना त्रास देखील होतो. बेजबाबदार वागणे आम्ही सावित्रीमाईकडून शिकलोच नाहीत तर आम्हास फोटो शूट आणि व्हिडियो काढण्यात आनंद आहेत.
अधिकमासात दान करण्याची प्रथा ! -वास्तविक संस्कृती आहे तिथेच आहेत मुळात डिजीटल व्यवस्थेने कितपत गोंधळ घालावा ही वैयक्तिक बाब जरी असली तरी अधिकमासात दान करण्याची प्रथा आहेत.संस्कृतीत दान हे गुप्त स्वरूपाचे असावे ते असे मनमोकळे व्हायरल करण्याइतकी संस्कृती लहान नाहीत. इव्हेंट केल्याने संस्कृतीला बाजारुपणा येत आहेत.जावयासाठी स्वताच्या हाताने बनविलेले पदार्थ हवेत की आता हॉटेल बुकिंग केले जाते आणि आयुष्यात त्यागाने केलेल्या गोष्टींत आनंद च मिळाला पाहिजे। दान केल्याने स्वआनंद मिळणे देखील गरजेचे आहेत.
:- डॉ.प्रसाद कुळकर्णी – येवला
दानधर्म करायचे , दान धर्म केले
पूजापाठ करायचे , पूजापाठ केले
अधिकमास करायचा म्हणून
आई बाबांनी बोलावले
यांना घेऊन मी माहेरी आले
माहेरच्या माणसांची बातच न्यारी !
जावयाच्या स्वागताला जमली सारी
बाबांची मी लाडकी
आईने खाऊ घातले प्रेमाने
भावंडांच्या मेळ्यात रमले
खूप दिवसाने चल उठ प्रिये
तिकडून आले फर्मान
वेळेचे काही राहिलेच नाही भान
गोडकौतुक केले बाबांनी
केले प्रेमाने अधिक वान
– सौ। स्नेहन बोढारे /गायकवाड नाशिक
२१ व्या शतकात आपण डिजिटल युगात वास्तव करत आहोत.या युगात भारतीय संस्कृतीत अधिकमास आपण लेक जावई यांचा मान सन्मान करतो. ही परंपरा मधल्या काळात लोप पावली होती डिजिटल युगामुळे का होईना ही परंपरा परत जोरात सुरू झाली आहेत त्यामुळे येणाऱ्या नवीन पिढीला भारतीय संस्कृतीची ओळख होईल. – सौ. मंगला पांडुरंग खोटरे , सातपूर
प्रतिक्रिया – या महिन्यात मुलीचे आई वडील जावयला घरी बोलवून त्यांना रितसर गंध वगैरे लावून ओवाळतात. पंचपक्वाने त्यांचा मानपान केला जातो. जावयाला अधिकमासाचं वाण दिलं जातं. हिंदू धर्मात मुलगी – जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानतात. म्हणून जावयाला तुपात तळलेले तेहतीसच्या पटीत अनारसे देतात. एका चांदीच्या अथवा तांब्याच्या ताम्हणात अनारसे ठेवून त्यावर तांब्याचा दिवा ठेवून तो लावून जावयाला देतात. अनारसे ऐवजी बत्तासे, म्हैसूरपाक, वगैरे जाळीदार पदार्थ द्यावयाचे असतात, यांची संख्या ३३ असावी. या महिन्यात नारळ, सुपाऱ्या, फळे यांसारख्या वस्तू सुद्धा तेहतीसच्या पटीत घेऊन दान करतात. – सीमा चित्ते नाशिक
COMMENTS