Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारतीय ध्वज सर्वांच्या अस्मितेचे प्रतिक – डॉ.सौ.कल्पनाताई चौसाळकर

अंबाजोगाई प्रतिनिधी - परकीयांच्या जुलमी राजवटी विरुद्ध लढण्यासाठी स्वातंत्र्य संग्रामात प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकांना प्रेरणा देणारा भारतीय ध्व

पात्र-अपात्रतेचा फैसला !
भंडारा : मुरुम उत्खनन प्रकरणी मोहाडी तहसीलदारांनी केली कारवाई| LokNews24
 डोंबिवलीत प्रियकरांनी केली प्रेयसीची हत्या

अंबाजोगाई प्रतिनिधी – परकीयांच्या जुलमी राजवटी विरुद्ध लढण्यासाठी स्वातंत्र्य संग्रामात प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकांना प्रेरणा देणारा भारतीय ध्वज सर्वांच्या अस्मितेचे प्रतिक आहे.सर्वांनी ’मेरी मिट्टी मेरा देश’ या अभियानाच्या माध्यमातून ’हर घर तिरंगा’ उपक्रमाद्वारे तिरंगा ध्वज घरोघरी लावावा असे आवाहन भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्या डॉ.सौ.कल्पनाताई चौसाळकर यांनी केले.

  ’स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ उपक्रमांतर्गत देश पातळीवर राबविण्यात येणार्‍या ’मेरी मिट्टी,मेरा देश’ या अभियानाचे औचित्य साधून पोखरी येथील लोकमान्य टिळक विद्यालयात घेण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी  प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.चौसाळकर ताई बोलत होत्या. प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारा आणि देशभक्ती जागृत करणारा तिरंगा ध्वज सर्वांच्या सन्मानाचे प्रतिक आहे.सर्वांनी दि.13 ते दि.15 ऑगस्ट 2023 रोजी घरोघरी तिरंगा ध्वज उभारून या प्रतिकातून बंधुभाव जपत ’माझा देश,माझी माती’ ही भावना चिरकाल टिकवावी असे विचार त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाच्या प्रांगणात सकाळी ठीक 7:50वा भा.शि.प्र.संस्थेच्या विद्यमान केंद्रीय कार्यकारिणी सदस्या डॉ.सौ.कल्पनाताई चौसाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अंबाजोगाई येथील श्री.खोलेश्वर जिनिअस इंटरनॅशनल स्कूल चे उपाध्यक्ष  डॉ.गोपाळराव चौसाळकर,गावचे सरपंच श्री.श्रीहरी होळकर,उपसरपंच श्री.दौलतराव निकम,माजी सरपंच श्री.विश्वनाथआप्पा निकम,श्री.भास्कर निकम,ग्रामपंचायत सदस्य श्री.रामलिंग वाघमारे,श्री.संतोष निकम,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.संजयराव विभूते उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या वतीने कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतमाता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच विद्यालयाच्या वतीने सर्वांचे यथोचित स्वागत करण्यात आले.   कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांच्या उपस्थितीत विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक श्री.नितीन चौधरी तर आभार प्रदर्शन जेष्ठ शिक्षक श्री.ज्ञानेश मातेकर यांनी केले.  कार्यक्रमात सर्व विद्यार्थी,पालक,माजी विद्यार्थी, ग्रामस्थ,शिक्षक,कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

COMMENTS