Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकनेते विनायकराव मेटे यांचे प्रथम पुण्यस्मरण 14 ऑगस्ट रोजी

बीड प्रतिनिधी - लोकनेते विनायकराव मेटे यांनी आपली उभी हायत समाजासाठी अर्पण करत समाजाच्या लढ्यासाठी घालवली मराठा , मुस्लिम , धनगर आरक्षण मिळावे या

भाजप विरुद्ध ‘मविआ’आज सामना रंगणार
पठाण फिल्मच्या निर्माते, दिग्दर्शकांनी समोर येऊन त्यांची भूमिका मांडावी – राम कदम 
राष्ट्रपिता महात्मा गांधी हे जगाचे शांतीदूत : आमदार डॉ.सुधीर तांबे

बीड प्रतिनिधी – लोकनेते विनायकराव मेटे यांनी आपली उभी हायत समाजासाठी अर्पण करत समाजाच्या लढ्यासाठी घालवली मराठा , मुस्लिम , धनगर आरक्षण मिळावे या मागणीसाठी त्यांनी जीवाची पराकाष्टा केली आपण शेवटच्या श्वासापर्यंत मराठा आरक्षण लढा चालू ठेवणार अशी भीष्म प्रतिज्ञा त्यांनी केली होती आणि त्यांचा शेवटही मराठा आरक्षणावर होवू घातलेल्या मुंबई येथील बैठीकाला जाताना झाला अश्या या लढवय्या नेत्याच्या जनयाने समजा पोरका झाला आहे. दी. 14 ऑगस्ट रोजी विनायकराव मेटे यांचे प्रथम पुण्यस्मरण आशीर्वाद लॉन्स , बार्शी रोड येथे ढोक महाराज यांच्या किर्तांनाने होणार आहे.
         लोकनेते विनायकराव मेटे यांच्या निधनाला बघता बघता वर्ष लोटले त्यांनी त्यांच्या हयातीत केलेल्या कार्य मुळे ते सदैव जन सामन्यांच्या स्मरणात राहील मात्र त्यांचे निधन झाले आहे हे आणखी ही मनाला न पटणारी गोष्ट आहे. नुकतीच विनायकराव मेटे यांची जयंती त्यांच्यावर प्रेम करणार्‍या चाहत्यांनी विविध सामाजिक उपक्रमानी साजरी केली या जयंती कार्यक्रमास राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थिती पार पडला. आता पुण्यतिथी ही धार्मिक कार्यक्रमनी साजरी केली जाणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसंग्रामच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS