Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जि.प.प्राथमिक शाळा जीवाचीवाडी येथे विविध स्पर्धा संपन्न

केज प्रतिनिधी- केज तालुक्यातील जीवाचीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध उपक्रम घेऊन मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवा निमित्त पत्रक

दहिवडी पोलीस ठाण्याला सीसीटीएनएस प्रणालीत सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार
499 रुपयांमध्ये खरेदी करा ‘हा’ 8000 रुपयांचा फोन
शिक्रापुरात दारुच्या नशेत इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

केज प्रतिनिधी- केज तालुक्यातील जीवाचीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध उपक्रम घेऊन मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवा निमित्त पत्रकार वसंत सोनवणे व राजाभाऊ केदार यांना सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवा निमित्त हिंदवी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत जीवाचीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध उपक्रमां सह भाषण स्पर्धा मोठ्या उत्सवात संपन्न झाल्या या कार्यक्रमाचे आयोजन हिंदवी बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने करण्यात आले होते.केज तालुक्यातील जीवाचीवाडी येथे दिनांक 8 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी ठीक 8 ते 10 वाजण्याच्या दरम्यान हिंदवी बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने दोनशे झाडांची लागवड करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मोराळे सर तर प्रमुख पाहुणे पत्रकार वसंत सोनवणे,राजेभाऊ केदार यांची प्रमुख उपस्थिती होती.सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.यावेळी हिंदवी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. जीवाचीवाडी येथील हायस्कूल व जिल्हा परिषद शाळा, तूकोचीवाडी रोड, रानुबाईचीवाडी रोड, हनुमान रोड इत्यादी ठिकाणी झाडांची लागवड करण्यात आली आहे. सकाळी ठीक 10-30 वाजता भाषण स्पर्धा घेण्यात आल्या.या भाषण स्पर्धेमध्ये इयत्ता पहिली ते चौथी या गटातून प्रथम क्रमांक कु.आरती चौरे, द्वितीय क्रमांक कु.शीतल फुंदे,तृतीय क्रमांक चि. श्रीकांत सारुक तर इयत्ता पाचवी ते सातवी या गटातून प्रथम क्रमांक कु.संस्कृती चौरे,द्वितीय क्रमांक कु.शितल खाडे, तृतीय क्रमांक कु.उमा चौरे व इयत्ता आठवी ते दहावी या गटातून प्रथम क्रमांक कु.उर्मिला चौरे,द्वितीय क्रमांक कु.काजल चौरे, तृतीय क्रमांक कु.लक्ष्मी खाडे या विद्यार्थ्यांनी पटकावला आहे. या स्पर्धेतील विजेते विद्यार्थी यांच्यासह काही गुणवंत विद्यार्थी यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान उपस्थित मान्यवरां च्या हस्ते करण्यात आला. यावेळी मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवा निमित्त पत्रकार वसंत सोनवणे व राजाभाऊ केदार यांना सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मोराळे सर, जाधवर मॅडम,गुट्टे मॅडम, उंडाळे मॅडम,ढवळसिंग सर,साबळे सर,मुळे सर, बोबडे सर,बचुटे सर,ओम सारुक,शालेयव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबुराव चौरे,मा.अध्यक्ष बद्रीनाथ चौरे,हिंदवी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सीमा चौरे,सचिव परमेश्वर चौरे,कोषाध्यक्षा शितल चौरे,सहसचिव रामेश्वर गदळे,रामेश्वर चौरे यांच्या सह गावातील नागरिक व शाळेतील विद्यार्थी,स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी विविध विषया वर मनोगत व्यक्त करून उपस्थितांची मने जिंकली.

COMMENTS