Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाल्मिक आण्णा कराड यांच्या मध्यस्थीने शेतकर्‍यांच्या समस्या सुटणार -शिवराम राऊत

शिरूर प्रतिनिधी - लोकनायक मा.आ.स्व.विनायकराव मेटे साहेब यांच्या प्रेरक विचारसरणीचा वसा घेत जनसामान्य व शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसंग्र

वरकुटेच्या मुली सलग दुसर्‍यांदा कबड्डीत राज्यात अव्वल; चार मुलींची राज्याच्या संघात निवड
‘श्रीकृष्ण चारित्र्य मंजिरी’ लघु ग्रंथावरील टीकेच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन‘
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर संजय राऊत यांची टीका

शिरूर प्रतिनिधी – लोकनायक मा.आ.स्व.विनायकराव मेटे साहेब यांच्या प्रेरक विचारसरणीचा वसा घेत जनसामान्य व शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसंग्राम शिरूर  यांच्या वतीने माऊली शिंदे,(ता.अ.शिवसंग्राम शिरूर) श्री.शिवराम राऊत (ता.अ.ओ.बी.सी आघाडी शिवसंग्राम शिरूर), भिमराव बेलदार(शिवसंग्राम ऊसतोड कामगार आघाडी),कृष्णा परजणे (युवा आघाडी जि.सचिव) यांनी ना.धनजंय मुंडे (कृषिमंत्री महा.राज्य ) यांचे अत्यंत विश्वासू समर्थक श्री.वाल्मिक आण्णा कराड यांची जगमित्र संपर्क कार्यालय परळी येथे भेट घेऊन मौ.हिवरसिंगा सह शिरूर तालुक्यातील महत्त्वाचे शेतकरी समस्या सोडवण्यासाठी भेट घेतली या वेळी श्री.वाल्मिक आण्णा यांनी शिवराम राऊत यांचे फोनवरून मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे संपर्क करून देत मौ.हिवरसिंगा मधील चिमटा सर्वे.न. साठी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत नवीन 63.एच.पी.विद्युत ट्रान्सफॉर्मर, पोख्रा योजनेची उजतखऊ काळातील मुदतवाढ,औषधी वनस्पती व फळबाग लागवड क्षेत्रासाठी सौरकूंपन अथवा काटेरी तार कूंपंन साठी राज्यशासन अनुदानित योजना , हिवरसिंगा नदी ते कुटे-बडे वस्ती दरम्यान जिल्हा नियोजन निधी अंतर्गत तीन ठिकाणी पूल बांधण्यात यावा, कर्जमुक्ती योजनेतील नियमितपणे पीककर्ज नवेजूणे करणारे शेतकरी यांना प्रोत्साहन अनुदान मिळावे.असे निवेदन केले.त्यावर मा.ना.मंत्री महोदयांनी तात्काळ निर्णय घेत शासनस्तरावरून प्रयत्न केला जाईल व चिमटा सर्वे नं. साठी तात्काळ नवीन विद्युत ट्रन्सफार्मर मंजूरी करण्यासाठी कार्यकारी अभियंता विद्युत .वितरण कं. विभागीय कार्यालय बीड यांना लेखी सुचना केली आहे.जिल्हा नियोजन मधील राखीव निधी अंतर्गत तांत्काळ अंदाज पत्रक व इतर कागदपत्रे तयार करून घेण्याचे आदेश दिले.या निर्णयामुळे मौ.हिवरसिंगा सह तालुक्यातील शेतकरी समस्या सोडवण्यासाठी तत्पर मंत्री महोदय यांचे आभार व्यक्त केले.या पूर्वी शिवराम राऊत यांच्या वतीने बीडच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्रीम.दिपा मुधोळ यांची भेट घेऊन या संबंधीची शिफारस करावी अशी विनंती मान्य करून कार्यकारी अभियंता यांना पत्र व फोनवरून सुचित केले होते.तसेच भावी पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे यांनी तातडीने दखल घेतली व संबंधित यंत्रणेला सुचना दिल्या आहेत. लवकरच जिल्हा नियोजन मधील राखीव निधी उपलब्ध करून नवीन विद्युत ट्रन्सफार्मर चिमटा सर्वे न.मध्यै बसवून शेतकर्‍यांना होणारा त्रास कमी होईल.असे शिवराम राऊत यांनी कळवले आहे.

COMMENTS