Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचे चालतं-बोलतं विद्यापीठ काळाच्या पडद्याआड  

जिवाभावाचा मित्र गमावला; छगन भुजबळ-कपिल पाटील भावूक

मुंबई/प्रतिनिधी : फुले साहित्याचे अभ्यासक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनावर पुरोगामी चळवळीतून दु:ख व्यक्त केले जात

‘अधिकारी नडला तर त्याला फोडला
अक्षय कुमार आणि रवीना टंडन अवॉर्ड फंक्शनमध्ये एकत्र
सरकारकडून नवीन वर्षाची भेट, LPG सिलिंडरच्या दरात कपात

मुंबई/प्रतिनिधी : फुले साहित्याचे अभ्यासक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनावर पुरोगामी चळवळीतून दु:ख व्यक्त केले जात आहे. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि आमदार कपिल पाटील यांनी आपला मित्र गमावल्याची भावना व्यक्त केली आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही अभ्यासू व्यक्तीमत्व गमावल्याचे म्हटले आहे. हरी नरके यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने देशातील ओबीसी चळवळीची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे, असे म्हणत छगन भुजबळ यांनी दु:ख व्यक्त केले.

हरी नरके यांच्या जाण्याने पुरोगामी चळवळीचा मोठे नुकसान झाले आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा वैचारिक आधारस्तंभ निखळला आहे. चळवळीला मोठा धक्का बसला आहे. फुले शाहू आंबेडकरांचा खरा इतिहास पुढे आणायचे काम ते करत होते. अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहे. परदेशातही त्यांची व्याख्याने व्हायची. फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे ते चालत बोलत विद्यापीठ होते, असेही भुजबळ म्हणाले. हरी नरके यांचे निधन चटका लावून जाणारे आहे. त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष झाले. महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र साहित्य प्रकाशित करणार्‍या समितीचे ते अध्यक्ष होते. ओबीसी समाजाच्या चळवळीत त्यांचा मोठा सहभाग राहिला. अवघ्या साठाव्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांची 56 पुस्तक प्रकाशित झाली आहेत. आज माझा जिवाभावाचा मित्र गेला. हरी नरके हे कायम लक्षात राहतील, असे आमदार कपिल पाटील म्हणालेत. राष्ट्र सेवा दल अध्यक्ष नितीन वैद्य यांनीही हरी नरके यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. हरी नरके यांचे अकाली जाणे धक्कादायक आणि दुखःद आहे. 1983 पासूनचे आमचे संबंध होते. चळवळी दरम्यान त्यांनी तुरुंगवास देखील भोगला होता. जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे ते चालत फिरत विद्यापीठ होते. परखड विचारवंत आणि अभ्यासू असे ते आमचे मित्र होते. पुरोगामी चळवळीचा चालता बोलता ज्ञानाकोश आज हरपला. मनोहर भिड यांनी जेव्हा जोतिबा फुलेंचा अपमान केला होता. तेव्हा आवाज उठवण्यात ते अग्रगण्य होते, असे म्हणत नितीन वैद्य यांनी यांनी आठवणी सांगितल्या. नाना पटोले यांनी हरी नरके यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सामाजिक आणि बहुजनांचा आवाज असणारे हे विद्वान व्यक्तीमत्व हरी नरके यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. मागच्या आठवड्यात त्यांच्यासोबत चर्चा झाली होती. आताही त्यांच्यासोबत चर्चा करणार होतो. पण आज अचानकपणे त्यांच्या निधनाचे वृत्त समोर आले. त्या जाण्याने वैचारिक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या परिवाराला दुःख पेलण्याची शक्ती मिळो, हीच प्रार्थना, असे पटोले म्हणाले.

कृतीशील कार्यकर्ता गमावलाः  उपमुख्यमंत्री अजित पवार – ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या निधनाने महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर श्रद्धा असलेला, ओबीसी हक्कांसाठीच्या चळवळीत आघाडीवर राहून लढणारा कृतिशील कार्यकर्ता आपण गमावला आहे. ते सामाजिक प्रश्‍नांचे अभ्यासक, परखड भाष्यकार होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या साहित्याचे अभ्यासक, संशोधक, व्याख्याते ही त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनानं दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांची बाजू हिरिरीने मांडणारे, ओबीसी चळवळीला वाहून घेतलेले बुद्धिवादी व्यक्तिमत्व हरपले आहे. त्यांचे निधन ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, परिवर्तनवादी चळवळीची हानी झाली आहे.

पुरोगामी विचारांचा वाहक गमावला ः मुख्यमंत्री शिंदे – महाराष्ट्रातील पुरोगामी विचारधारेचे जतन, संवर्धन करणारा परखड असा विचारवंत आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. महाराष्ट्राच्या विचार-व्यासपीठावर आपल्या अभ्यासपूर्ण आणि परखड विचारांनी प्रा. हरी नरके यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. फुले- शाहू-आंबेडकर यांचा विचार महाराष्ट्रासह सर्वदूर पोहोचावा यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचा जीवनपरिचय आणि त्यांच्या विषयीचे संशोधनात्मक लेखन यांचा त्यांचा व्यासंग होता. यातून त्यांनी उत्कृष्ट अशा ग्रंथसंपदेची निर्मिती केली. वक्तृत्वाची आगळी शैली आणि अभ्यासपूर्ण मांडणी हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांनी समता परिषदेच्या माध्यमातून रचनात्मक काम केले. त्यांच्या निधनामुळे पुरोगामी चळवळ आणि राज्यातील अभ्यास-संशोधनात्मक लेखन प्रवाहाची हानी झाली आहे, असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

COMMENTS