Homeताज्या बातम्यामनोरंजन

अदा शर्मा हिने गायली मराठी कविता

द केरळ स्टोरी' सिनेमानंतर अभिनेत्री अदा शर्मा हिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. सिनेमाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिस

मांडवगणमध्ये खासदार निलेश लंके यांचा नागरी सत्कार
दिंडीतील मृत वारकर्‍यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये
वृक्षतोड रोखण्यासाठी चार पथके तैनात


द केरळ स्टोरी’ सिनेमानंतर अभिनेत्री अदा शर्मा हिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. सिनेमाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील मोठी मजल मारली. यंदाच्या वर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांमध्ये ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा देखील अव्वल स्थानी आहे. ‘द केरळ स्टोरी’ सिनेमामुळे अभिनेत्री अदा शर्मा हिच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली आहे. सोशल मीडियावर देखील अदा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अदा सोशल मीडियावर कायम फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता देखील अभिनेत्रीने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे…अदा शर्मा हिने आता पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये शाळेतील आठवणी ताज्या केल्या आहेत. अदा शर्मा हिने शाळेत शिकवलेली मराठी कविता चाहत्यांना ऐकवली आहे. सध्या अदा हिने पोस्ट केलेला कवितेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. अदा शर्मा कविता पोस्ट करत म्हणाली, ‘इडली आणि चवळी चटक नंतर लोकांच्या मागणीवरून मी शाळेत शिकलेली दुसरी मराठी कविता….कसं वाटलं?’ मॅगझिनच्या कव्हर शूटच्या लंच ब्रेक दरम्यान अदा शर्मा हिने व्हिडीओ शूट केला आहे. चाहत्यांना देखील अदा शर्मा हिने गायिलेली कविता फार आवडली आहे. अदा शर्मा कवितेवर चाहते कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी म्हणाली, ‘मराठी मुलगी…, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘मस्त वाटलं…. अशा अनेक प्रतिक्रिया अभिनेत्रीच्या सोशल मीडिया पोस्टवर येत आहेत. सोशल मीडियावर फक्त आणि फक्त अदा शर्मा हिच्या कवितेची चर्चा रंगली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अदा हिने तिच्या प्रकृतीबद्दल चाहत्यांना महत्त्वाची माहिती दिली होती. अदा हिला फूड पॉयझनिंग आणि डायरियाचा त्रास होऊ लागल्याने तिची तब्येत खूपच बिघडली होती. त्यामुळे उपचारांसाठी तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली. पण आता अदा हिची प्रकृती स्थिर आहे. अदा शर्मा हिच्या बॉलिवूड प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘1920’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्रीने ‘हम हैं राही प्यार के’ ‘हर्ट अटॅक’, ‘हंसी तो फंसी’ ‘कमांडो-2’ यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता अदा शर्मा बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रींपैकी एक आहे.

COMMENTS