Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महापुरूषांच्या अवमानाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा  

अहमदनगर/प्रतिनिधी ः नगर शहरामध्ये दिवसेंदिवस महापुरुषांच्या बदनामीचे षडयंत्र करून शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण केला जात असल्याच्य

संजीवनीच्या विकासात कर्मचार्‍यांचा मौलिक सहभाग – बिपीनदादा कोल्हे
कोरोनामुळे मृत झालेल्यांवर नगरमध्येच अंत्यसंस्कार व्हावेत ; युवा सेना जिल्हा प्रमुखांची मागणी
कोपरगाव ते येवला दरम्यान सर्व एसटी बसला थांबे द्या

अहमदनगर/प्रतिनिधी ः नगर शहरामध्ये दिवसेंदिवस महापुरुषांच्या बदनामीचे षडयंत्र करून शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण केला जात असल्याच्या निषेधार्थ शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोटारसायकल रॅली काढून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.याप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

ही रॅली माळीवाडा येथील एस.टी.स्टॅण्ड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून मोटारसायकल रॅलीस प्रारंभ करण्यात आला. शहराच्या विविध भागातून ही रॅली काढण्यात आली. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यावर जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर शहरात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांची बदनामी करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहरात अशांतता माजविण्याचा डाव केला जात असून, आगामी काळातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी काही नेते मंडळी विशिष्ट समाजाला हाताशी धरून असे उद्योग करत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अल्पवयीन मुलांना महापुरुषांबद्दल अपशब्द वापरायला सांगून जातीय तेढ निर्माण करण्यास भाग पाडत आहे, असा आरोप करण्यात आला आहे. असाच एक प्रकार शनिवारी रात्री मुकुंदनगर भागातील समाजकंटकांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरुन सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप तयार करून प्रसारित केली. अशा समाज कंटकाविरोधात देश द्रोहाचा गुन्हा दाखल करून जिल्ह्यातून हद्दपार केलेच पाहिजे. अशा समाज कंटकांवर देशद्रोहाचे कलम लावण्यात यावे, जेणे करुन अशा घटना पुन्हा घडणार नाही, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी शहरप्रमुख संभाजी कदम म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून नगर शहरात महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून समाजा समाजात तेढ निर्माण करुन वातावरण दूषित करत आहेत. अशा घटनांचे पडसाद राज्यभर उमटत असल्याने अशा प्रवृत्तीला वेळेच ठेचले पाहिजे. नगरमध्ये कायद्याचा धाक राहिलेला नाही, तरी शासनाने अशा व्यक्तींवर, देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावे, जेणे करून पुन्हा अशा घटना घडणार नाही. अन्यथा आम्हालाच अशा लोकांचा बंदोबस्त करावा लागेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या रॅलीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

COMMENTS