Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माध्यमिक विद्यालय तलवाडा येथे विद्यार्थ्यांचे प्रश्न ? आणि मेघारे सरांचे उत्तरे

तलवाडा प्रतिनिधी - शिक्षण तज्ञ मुलाखत संपन्न माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तलवाडा येथे शारदा स्पोर्ट अकॅडमी चे प्रमुख मा. रणवीर काका पंडित या

Karmaala : वैद्यकीय सेवेसाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नवीन अँबुलन्स खरेदी
दंगलीमागचे राजकारण
अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलाचे खासगीकरण थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन

तलवाडा प्रतिनिधी – शिक्षण तज्ञ मुलाखत संपन्न माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तलवाडा येथे शारदा स्पोर्ट अकॅडमी चे प्रमुख मा. रणवीर काका पंडित यांच्या संकल्पनेतून, शिक्षण तज्ञ मुलाखत संपन्न झाली. यावेळी इंग्रजी विषयाचे गाढे अभ्यासक मेघारे सर यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मोकळी वाट करून दिली. याप्रसंगी अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य गोरकर  सर, पर्यवेक्षक हाटकर सर , उच्च माध्यमिक विभाग प्रमुख प्रा.भोसले सर, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा.पैठणे सर, सांस्कृतिक विभागाचे जाधव सर , येवले सर,लाड सर,सी.बी. तौर सर, आदी शिक्षक बांधव उपस्थित होते. यावेळी मुलांनी आपल्या मनातील शैक्षणिक प्रश्न मेघारे सरांना विचारले मेघारे सर यांनी सर्व मुलांना पटतील, रुचतील अशी समय सूचक पद्धतीने उत्तरे दिली. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण तज्ञ मुलाखत संपन्न झाली. याचे प्रस्ताविक हाटकर सर यांनी केले.

COMMENTS