Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे शहराची वाटचाल अमली पदार्थांच्या हबकडे

60 लाखाचे अफू पुणे पोलिसांकडून जप्त

पुणे ः पुणे शहरात गेल्या महिन्यांपासून सातत्याने अमली पदार्थ जप्त करण्यात येत असून, त्यामुळे पुणे शहराची अमली पदार्थांचे हब बनण्याच्या दृष्टीने स

सिक्किममध्ये ढगफुटीमुळे पूर, लष्कराचे 23 जवान बेपत्ता
मुंबईवर पाणीकपातीचे संकट कायम
नगरसेविका ते राष्ट्रपती मुर्मूंचा संघर्षमय प्रवास

पुणे ः पुणे शहरात गेल्या महिन्यांपासून सातत्याने अमली पदार्थ जप्त करण्यात येत असून, त्यामुळे पुणे शहराची अमली पदार्थांचे हब बनण्याच्या दृष्टीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. कारण पुण्यामध्ये सातत्याने अमली पदार्थांची तस्करी होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत.

पुण्यातील तरुण व्यसनांच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहेत. अशामध्ये पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. तब्बल 60 लाख रुपयांचे अफू जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी 24 वर्षांच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या हडपसर भागात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मोहनलाल मेगाराम बिष्णोई असे या अटक करण्यात आलेल्या 24 वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. राजस्थानवरुन हा तरुण पुण्यातील हडपसर परिसरात अफू विक्री करण्यासाठी आला होता. या तरुणाकडून अमली पदार्थ विरोधी पथकाने तब्बल 60 लाखांचे अफू जप्त केले आहेत. पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला हडपसर भागातील फुरसुंगी परिसरात एक तरुण अफू विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. या तरुणाकडे असलेल्या पिशवीची पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये अफू असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी मोहनलालला अटक केली. मोहनलालकडून 3 किलो 29 ग्रॅम वजनाचे अफू जप्त करण्यात आले आहे. याची किंमत 60 लाख असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांकडून मोहनलालची चौकशी सुरु आहे. त्याने हे अफू कोणाच्या सांगण्यावरुन हडपसरमध्ये आणले होते याचा तपास पोलिस करत आहेत.

COMMENTS