मुंबई/प्रतिनिधी ः इर्शाळवाडी दुर्घटनेला 12 दिवस पूर्ण झाले आहेत. या दुर्घटनेनंतर इर्शाळवाडीच्या दरडग्रस्त ग्रामस्थांना कायमस्वरूपी पुर्नवसनाच्या
मुंबई/प्रतिनिधी ः इर्शाळवाडी दुर्घटनेला 12 दिवस पूर्ण झाले आहेत. या दुर्घटनेनंतर इर्शाळवाडीच्या दरडग्रस्त ग्रामस्थांना कायमस्वरूपी पुर्नवसनाच्या कामाला वेग आला आहे. चौक येथील मानिवली गावतील शासनाच्या मालकीची जमीन इर्शाळवाडीच्या ग्रामस्थांचे पुर्नवसन करण्यासाठी निश्चित करण्यात आली आहे. मानिवली गाव हद्दीतील सर्वे क्रमांक 27/1 ब या गुरचरण जागेपैकी सुमारे 6 एकर जागेत इर्शाळवाडी दरडग्रस्तांचे पुर्नवसन होणार आहे. या जागेचे मोजमाप करुन शासन दरबारी प्रस्ताव देखील सादर झाला आहे.
खालापूरनजीकच्या इर्शाळगडाच्या पायथ्याशी असणार्या इर्शाळगडावर 19 जुलैला रात्री साडेदहाच्या सुमारास दरड कोसळली. या घटनेत संपूर्ण इर्शाळवाडी मातीच्या ढिगार्याखाली दाबले गेले. या गावामध्ये जवळपास 45 पेक्षा जास्त घरे होती. फक्त 5 घरातील सदस्य या दुर्घटनेमध्ये बचावले बाकी सर्वजण ढिगार्याखाली अडकले. या दरड दुर्घटनेत जवळपास 84 ग्रामस्थ ढिगार्याखाली अडकले होते. तीन दिवसांच्या बचावकार्यादरम्यान बचाव पथकाने एका महिलेला सुरक्षित बाहेर काढले. तर शोधकार्यात 27 ग्रामस्थांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर 57 ग्रामस्थांचे मृतदेह सापडले नाही. सतत पडणारा मुसळधार पाऊस धुके आणि चिखलामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. पण मृतदेहाचे विघटन होण्यास सुरुवात झाल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले होते. 57 ग्रामस्थांना बेपत्ता जाहीर करून मृत घोषित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. इर्शाळवाडीवरील 42 कुटुंब सध्या शासनाने दिलेल्या तात्पुरत्या निवारा शेडमध्ये राहत आहेत. आज या दरड दुर्घटनेला 12 दिवस पूर्ण झाले असुन दुर्घटनास्थळी शनिवारी मृतांचे सामूहिक उत्तरकार्य करण्यात आले. यानिमित्ताने शनिवारी दिवसभर या ठिकाणी पिंडदान, मृतांचे पूजन आदी धार्मिक विधी करण्यात आले. मृतांचे नातेवाईक, अप्तष्ट या ठिकाणी सांत्वनासाठी एकत्र आले होते.
COMMENTS